सभास्थळ झाले तुडुंब अन् भाजपाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सोडला सुस्कारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 12:49 AM2019-04-07T00:49:42+5:302019-04-07T00:50:16+5:30

वर्धा येथील नरेंद्र मोदींची सभा चांगलीच गाजली मात्र त्या सभेला कमी गर्दी होती. त्यामुळे नांदेड येथील शनिवारच्या या सभेची भाजपा पदाधिकाऱ्यांनी धास्ती घेतली होती. शहरापासून काहीसे दूर असलेले सभास्थळ, सभेची वेळ सायंकाळनंतरची. मात्र त्यानंतरही सायंकाळी ६.३० वाजताच सभास्थळ तुडुंब भरले आणि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

bjp activist feel ralax after people gather for rally | सभास्थळ झाले तुडुंब अन् भाजपाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सोडला सुस्कारा

सभास्थळ झाले तुडुंब अन् भाजपाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सोडला सुस्कारा

Next

विशाल सोनटक्के ।

नांदेड : वर्धा येथील नरेंद्र मोदींची सभा चांगलीच गाजली मात्र त्या सभेला कमी गर्दी होती. त्यामुळे नांदेड येथील शनिवारच्या या सभेची भाजपा पदाधिकाऱ्यांनी धास्ती घेतली होती. शहरापासून काहीसे दूर असलेले सभास्थळ, सभेची वेळ सायंकाळनंतरची. मात्र त्यानंतरही सायंकाळी ६.३० वाजताच सभास्थळ तुडुंब भरले आणि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या निमित्ताने शिवसेना-भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते एका व्यासपीठावर आले.
नांदेड येथील पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची ही तिसरी सभा होती. यापूर्वी शहरातीलच श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडियमवर त्यांची सभा पार पडली होती. त्यानंतर लोहा येथेही प्रचारसभा झाली होती. या दोन्ही सभेच्या तुलनेत शनिवारच्या सभेकडे सेना-भाजपासह विरोधकांचेही लक्ष लागले होते. वर्धा येथे नरेंद्र मोदी यांची नुकतीच प्रचारसभा झाली. यावेळी सभास्थळावरील काही भाग रिकामा होता. माध्यमातूनही याची चर्चा झाली होती. तसेच सोशल मीडियातूनही यावरुन भाजपाला ट्रोल केले जात होते. या पार्श्वभूमीवर सभा यशस्वी करण्याचे भाजपासमोर आव्हान होते. हे आव्हान भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यशस्वी पार पाडले.
शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव, शिवसेनेचे दक्षिणचे आमदार आणि विद्यमान हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत पाटील, पदाधिकारी भाजपाच्या व्यासपीठावर उपस्थित होते. शिवसैनिकांचीही गर्दी होती. सभेच्या निमित्ताने झालेला एकोपा पुढे मतदानापर्यंत टिकतो का, हे आता पाहावे लागेल.
स्पष्ट आवाज येत नसल्याने झाली घोषणाबाजी
मोदी यांच्या सभास्थळी येण्यापूर्वी भाजप-सेनेच्या काही वक्त्यांची भाषणे सुरु होती़ परंतु, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला ध्वनिक्षेपकाचा आवाजच येत नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली़बºयाच प्रयत्नानंतर साऊंड बॉक्सची दिशा तिकडे फिरविण्यात आली़ त्यानंतर नागरिक शांत झाले़
मोदी यांच्या सभेसाठी मैदानात ठिकठिकाणी साऊंड बॉक्स लावण्यात आले होते़ परंतु, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला असलेल्या साऊंड बॉक्सची दिशा चुकीच्या दिशेने करण्यात आली होती़ त्यामुळे आवाज येत नसल्यामुळे नागरिकांनी घोषणाबाजी केली़ यावेळी पत्रकारांच्या कक्षात असलेल्या व्यंकटेश साठे या भाजपाच्या पदाधिकाºयानेही अनेकवेळा हातवारे करुन व्यासपीठावरील इतर नेतेमंडळींच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला़ परंतु त्यांच्याकडे कुणाचे लक्षच गेले नाही़
त्यानंतर साठे यांनी स्वत: कामगारांच्या मदतीने साऊंड बॉक्सची दिशा फिरविण्याचा प्रयत्न केला़ यावेळी साऊंड बॉक्स स्टँन्डही एका बाजूने झुकला होता़ त्यामुळे त्यांच्याशेजारी बसलेले पत्रकार उठून दुसरीकडे गेले़ ही बाब शेजारीच असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, तहसीलदार किरण अंबेकर यांनी पाहिली़ त्यानंतर कामगारांना सूचना देत साऊंड बॉक्सची दिशा बरोबर करायला लावली़ या सर्व गोंधळात लोकांची घोषणाबाजी मात्र सुरुच होती़
सभास्थळी दुपारीच आलेल्या नागरिकांना सभेच्या ठिकाणी पाण्याची बाटली किंवा इतर साहित्य नेण्यास मज्जाव घालण्यात आला होता़ त्यामुळे प्रखर उन्हात नागरिकांना पाण्याविनाच बसावे लागले़
सुरक्षेच्या कारणास्तव खाद्यपदार्थही नेण्यास बंदी होती़ अनेकांनी मोबाईल सोबत पावर बँक, हेडफोन आदी साहित्य आणले होते़ नागरिक सभास्थळी आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या आठहून अधिक प्रवेशद्वारांतून आतमध्ये सोडण्यात येत होते़ त्यासाठी त्यांची कसून तपासणी करण्यात येत होती़ पायातील जोडेही काढून त्यांचीही पोलिसांद्वारे तपासणी करण्यात येत होती़

Web Title: bjp activist feel ralax after people gather for rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.