भाजप सरकार फसवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:05 AM2018-01-21T00:05:31+5:302018-01-21T00:08:14+5:30
राज्यासह देशातील बेरोजगारी, असहिष्णुता, महिलांवरील अत्याचार, शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे सर्वसामान्यांच्या मनात अस्वस्थता आहे. पिण्याच्या पाण्याचे, उद्योग व शेतीच्या पाण्याचे भाव वाढविले. शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा फसवी निघाली, वीज कनेक्शन तोडणे, शेती सिंचनासाठी आवश्यक सामग्रीच्या किमतीत वाढ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकरी हा राज्याच्या, देशाचा कणा आहे. मात्र हे सरकार कणाच मोडायला निघाले आहे, असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहा: राज्यासह देशातील बेरोजगारी, असहिष्णुता, महिलांवरील अत्याचार, शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे सर्वसामान्यांच्या मनात अस्वस्थता आहे. पिण्याच्या पाण्याचे, उद्योग व शेतीच्या पाण्याचे भाव वाढविले. शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा फसवी निघाली, वीज कनेक्शन तोडणे, शेती सिंचनासाठी आवश्यक सामग्रीच्या किमतीत वाढ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकरी हा राज्याच्या, देशाचा कणा आहे. मात्र हे सरकार कणाच मोडायला निघाले आहे, असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
लोहा येथील बैल बाजार मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवारी हल्लाबोल मेळावा घेण्यात आला़ याप्रसंगी अजित पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. शंकरअण्णा धोंडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्ष प्रवक्ते नवाब मलीक, चित्राताई वाघ, कमलकिशोर कदम, संग्राम कोते, आ.सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, कल्पना पाटील डोंगळीकर, प्रांजली रावणगावकर, बसवराज पाटील, वसंत सुगावे, हरिहर भोसीकर, जिल्हाध्यक्ष डॉ़ सुनील कदम, दिलीप धोंडगे, संजय क-हाळे, बाबूराव केंद्रे, आदींची उपस्थिती होती.
अजित पवार म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात लोहा-कंधार मतदारसंघात विविध धरणे, बॅरेजेस, तलावाला कुठलाही भेदभाव न ठेवता भरभरुन देण्यात आले़ पाण्यामुळे मराठवाडा सुजलाम् सुफलाम् होईल, नदीकाठची गावे हिरवीगार होऊन शेतकरी सुखी होईल. परंतु आजचे सरकार शेतकºयांचे वीज कनेक्शन तोडत आहे.
शेतकºयांचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली तीही फसवी, साडेतीन वर्षांत एकाही बेरोजगाराला नोकरी दिली नाही. मागासवर्गीय, आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही. शाळा, महाविद्यालय बंद होत आहेत. मग गरिबांच्या मुलांनी शिक्षण कसे घ्यायचे? प्रारंभी शिवाजी चौक ते मेळावा मैदानापर्यंत रॅली काढण्यात आली. याप्रसंगी धनंजय मुंडे, चित्राताई वाघ, नवाब मलीक यांनी सरकारवर हल्लाबोल केला. माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी आपल्या खास शैलीतून स्थानिक आमदारावर चांगलेच तोंडसूख घेतले. यशस्वीतेसाठी डॉ. सुनील धोंडगे, विलास पाटील घोरबांड, दत्ता पाटील तळणीकर, माधव पाटील मोरे, संतोष पाटील दगडगावकर, मनोज पा. मोरे आदींनी सहकार्य केले.
संविधान बचाव रॅलीमुळेच तिरंगा रॅली
४जनतेचे प्रश्न सरकारसमोर मांडण्याचा आणि तो सोडविण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा अधिकार विरोधी पक्षाला असतो़ परंतु, विरोधी पक्षाने जाहीर केलेला कोणताही कार्यक्रम चिरडून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे़ येत्या २६ जानेवारीला सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येवून संविधान बचाव रॅली काढण्याचा निर्णय घेतला़ ही रॅली अयशस्वी करण्यासाठीच भाजपने तिरंगा रॅली काढण्याचे नियोजन केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला़ सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात समाजातील कोणता घटक समाधानी आहे? असा सवालही त्यांनी केला़
वाघाचा कासव झाला
४बाळासाहेबानंतर आता शिवसेनेचा वाघ राहिला नाही तर तो शेळी झाला आहे़ नंतर तो ससा झाला, अन् आता तर कासव झाला. शिवसेनेत पूर्वीसारखी धमक राहिली नाही. शेपूट खाली घालून पळतो अशी अवस्था सेनेची झाल्याचे सांगत अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले़