समाजात तेढ निर्माण करू नये याचे भान भाजपला नाही; 'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचा हल्ला
By शिवराज बिचेवार | Published: November 9, 2024 11:24 AM2024-11-09T11:24:43+5:302024-11-09T11:27:07+5:30
जातीयवादाकडे निवडणूक न्यावी यासाठीच योगी आदित्यनाथ यांना राज्यात आणले, शरद पवारांची टीका
नांदेड: सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका आहेच आहे ती पुन्हा एकदा त्यांनी समोर आणली आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. 'बटेंगे तो कटेंगे' या प्रचारावर पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
शनिवारी ते नांदेड मध्ये बोलत होते, ते म्हणाले, निवडणूका येतात आणि जातात पण धर्माधर्मात जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम कुणी करू नये पण भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना याचे भान नाही. जातीयवादाकडे निवडणूक न्यावी यासाठीच योगी आदित्यनाथ यांना आणले जाते असे पवार म्हणाले.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत आम्हाला चिंतेचे कारणच नाही महाविकास आघाडीच्या उमेदवाराची स्थिती चांगली आहे, इथले मतदार भाजपच्या विचारसरनीला अजिबात पाठींबा देणार नाहीत. नांदेडला काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे, त्याबद्दल पवार म्हणाले, नांदेड उत्तर मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार हे अब्दुल सत्तार हेच आहेत, वसमतला सभेत कुणी तरी चिठ्ठी दिली होती त्यामुळे चुकून संगीता डक यांचे नाव घेतले. परंतु आम्ही अब्दुल सत्तार यांच्या पाठीमागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.