कवडीमोल भावामुळे भाजप नेत्याने पाच एकरावरील पीक केले नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 04:38 PM2018-06-04T16:38:34+5:302018-06-04T16:44:48+5:30
माजी खासदार तथा भाजपा नेते सुभाष वानखेडे यांनी वांग्याचे शेत उध्वस्त करुन राज्य सरकारला घरचा आहेर दिला.
नांदेड- वांग्याला बाजारात केवळ तीन ते चार रुपये किलोचा भाव मिळत असल्यामुळे माजी खासदार आणि भाजप चे नेते सुभाष वानखेडे यांनी सोमवारी वांग्याच्या पिकात ट्रॅक्टर घालून वांग्याची रोपे उपटून टाकली.
माजी खासदार तथा भाजपा नेते सुभाष वानखेडे यांनी वांग्याचे शेत उध्वस्त करुन राज्य सरकारला घरचा आहेर दिला. हदगाव येथील आपल्या शेतात सुभाष वानखेडे यांनी पाच एकर मध्ये वांग्यांच पिक घेतले होते. बाजारात वांगे विक्रीसाठी नेले असता त्यांना तीन रुपये किलोने भावा मिळाला. तीन ते पाच रुपये किलो भाव मिळत असल्याने लागवड आणि वाहतुकीचा देखील खर्च निघत नाहीये. त्यामुळे संतप्त झालेल्या वानखेडे यांनी ट्रकटरद्वारे वांग्याचे पाच एकर शेत नांगरुन टाकले.