कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे भाजप नेत्यांना विसर, नांदेड-हडपसर रेल्वेचे औरंगाबादेत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2022 01:44 PM2022-01-02T13:44:17+5:302022-01-02T13:47:49+5:30
Nanded-Hadapsar Railway : भाजप नेत्यांनी मास्क वापरण्याकडे आणि सोशल डिस्टन पालन करण्याकडे दुर्लक्ष केले.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जालन्याहून धावलेल्या हडपसर विशेष रेल्वेचे ( Nanded- Hadapsar Railway) आज औरंगाबादरेल्वेस्टेशनवर भाजप (BJP) नेत्यांकडून स्वागत करण्यात आले. परंतु कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवून हे स्वागत करण्यात आले. (BJP leaders forget about Corona restraint rules )
पूर्वीची नांदेड-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेसचे रूपांतर नांदेड-हडपसरमध्ये करून आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. आज उदघाटनाची रेल्वे जालना येथून धावली. या रेल्वेचे औरंगाबादेत भाजप नेत्यांनी स्वागत केले. मात्र यावेळी नेत्यांनी मास्क वापरण्याकडे आणि सोशल डिस्टन पालन करण्याकडे दुर्लक्ष केले.
वेळ बदलून अधिक कोच लावले
पूर्वी धावत असलेल्या नांदेड-पुणे रेल्वेची वेळ बदलून आणि नवीन आधुनिक एलएसबी तंत्रज्ञानाचे बोगी बसवून ही रेल्वे धावणार आहे. रविवार आणि मंगळवार रोजी नांदेडहून नवीन गाडी आता रात्री ९.३० ऐवजी सायंकाळी ६.३० वाजता सुटेल. पुणे येथे सकाळी ९.४० वाजता पोहचणारी सुपर फास्ट गाडी आता सकाळी ७ वाजता हडपसरला पोहोचेल. नवीन रेल्वे परतीच्या प्रवासाला हडपसरहून सोमवार आणि बुधवारी रात्री १२ वाजता निघेल यापूर्वी पुणे स्तानकावरून रात्री १० वाजता निघायची. नवीन रेल्वे नांदेडहून रविवारी आणि मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता निघेल. विस डब्यांची गाडी पूर्णा (सायं. ७ वा.) परभणी (१९.२८), सेलू (२०.०४), परतूर (२०.२४), जालना (२१.१३), औरंगाबाद( २२.२०), अंकाई(१), मनमाड( रात्री १.१५), कोपरगाव (१.२३), बेलापूर(२.१३) अहमदनगर(३.१०), दौंड कॉर्ड लाईन( ५.३८) हडपसर (६.५५)