भाजप शहराध्यक्षाचे बुधवारपासून साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:33 AM2020-12-16T04:33:26+5:302020-12-16T04:33:26+5:30
हदगाव - येथील आठवडी बाजार अवैध मांस विक्री विरोधात प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत सील लावण्यात आले होते. ...
हदगाव - येथील आठवडी बाजार अवैध मांस विक्री विरोधात प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत सील लावण्यात आले होते. तरीही सदरील दुकानदाराने सील तोडून दुकान परत चालू केल्याच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी भाजप शहराध्यक्ष बालाजी कऱ्हाळे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली.
आठवडी बाजार परिसरात चालू असलेल्या अवैध मांस विक्री विरोधात १७ ऑक्टोबर रोजी नगरपरिषद उपविभागीय कार्यालयात साखळी उपोषणाचे निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाचा प्रशासनाने विचार करून १९ ऑक्टोबर रोजी अवैध दुकानावर फौजदारी कार्यवाही व कायमस्वरुपी दुकान बंद करण्याचे लेखी देण्यात आले. त्यानुसार प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीत अवैध दुकानाला सील लावण्यात आले. तरीही शासनाला न जुमानता कुलपाचे सील तोडून दुकान परत चालू केल्याचे निदर्शनात आले. सदरील दुकानदारावर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अन्यथा १४ डिसेंबर रोजी बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा भाजप शहराध्यक्ष बालाजी कऱ्हाळे यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केला होता. त्यानुसार बुधवारपासून नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.