अशोक चव्हाणांच्या विरोधात भाजप बापूसाहेब गोरठेकरांना उतरविणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 02:44 AM2019-09-09T02:44:38+5:302019-09-09T02:45:05+5:30

लोकसभेनंतर अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढविला आहे

BJP will drop Bapusaheb Gorkhekar against Ashok Chavan! | अशोक चव्हाणांच्या विरोधात भाजप बापूसाहेब गोरठेकरांना उतरविणार!

अशोक चव्हाणांच्या विरोधात भाजप बापूसाहेब गोरठेकरांना उतरविणार!

Next

विशाल सोनटक्के 

नांदेड : काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला म्हणून भोकर विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस नेते अशोक चव्हाण रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. या अनुषंगाने सुरू असलेली विरोधकांची शोध मोहीम थांबली असून या मतदारसंघातून चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून नुकताच भाजपात प्रवेश केलेले बापूसाहेब गोरठेकर यांना रिंगणात उतरविले जाणार हे आता स्पष्ट झाले आहे.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल १ लाख ७ हजाराहून अधिक मते घेवून अशोक चव्हाण या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत अमिता चव्हाण यांनी पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकविला. येणाºया निवडणुकीत अशोक चव्हाण पुन:श्च या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत मिळत आहेत. या अनुषंगाने भाजपाकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू होता. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मदतीला धावून गेलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर यांनी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला असून विधानसभा निवडणुकीत गोरठेकर हे चव्हाण यांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे.

लोकसभेनंतर अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढविला आहे. या पार्श्वभूमीवर गोरठेकर चांगली लढत देतील, अशी भाजपाला अपेक्षा आहे. प्रताप चिखलीकर यांनीही या मतदारसंघात गोरठेकरांना ताकद देण्यास सुरुवात केल्याने भाजपासमोरचा उमेदवारीचा प्रश्न संपला आहे. काँग्रेसच्या या बालेकिल्यात भाजपा किती ताकदीने उभी राहते यावरच लढतीचे चित्र अवलंबून असेल.

पाच वर्षांत काय घडले?
भोकर विधानसभा मतदारसंघाचे अशोक चव्हाण यांनी प्रतिनिधीत्व केलेले आहे. लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांच्या जागेवर अमिता चव्हाण निवडून आल्या.
काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ म्हणून भोकरकडे पाहिले जाते. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला असून संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
गोरठेकर यांच्याबरोबर भोकर आणि उमरी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतल्याने भाजपा या मतदारसंघातून चांगली लढत देण्याची चिन्हे आहेत.

भोकर मतदारसंघाशी काँग्रेसचे जिव्हाळ्याचे नाते राहिलेले आहे. शंकरराव चव्हाणांपासून अशोक चव्हाणांनी या भागाच्या विकासासाठी मोठे योगदान दिलेले आहे. येणाºया निवडणुकीतही या मतदारसंघातील जनता काँग्रेससोबतच राहील. ताकद नसल्यानेच विरोधकांवर उमेदवार आयातीची वेळ आली आहे. - अमिता चव्हाण, आमदार, भोकर

Web Title: BJP will drop Bapusaheb Gorkhekar against Ashok Chavan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.