महिलांना आरक्षणाची भाजपाची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:18 AM2017-08-01T00:18:02+5:302017-08-01T00:18:02+5:30
महिलांना पहिल्यांदा ३३ टक्के आरक्षण देण्याची भूमिका भाजपाने आपल्या पक्षात घेतली होती़ त्यानंतर संसद व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण महिलांना मंजूर झाले़ ते आरक्षण आता ५० टक्के करण्यासाठी भाजपा तयार असून इतर पक्ष मात्र त्यासाठी तयार नसल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड:महिलांना पहिल्यांदा ३३ टक्के आरक्षण देण्याची भूमिका भाजपाने आपल्या पक्षात घेतली होती़ त्यानंतर संसद व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण महिलांना मंजूर झाले़ ते आरक्षण आता ५० टक्के करण्यासाठी भाजपा तयार असून इतर पक्ष मात्र त्यासाठी तयार नसल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली़
भाजपाच्या महिला प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप सोमवारी नांदेडमध्ये झाला़ यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष दानवे बोलत होते़ अध्यक्षस्थानी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा अॅड़ माधवी नाईक तर प्रदेश महामंत्री आ़ सुजितसिंह ठाकूर, माजी प्रदेशाध्यक्ष किरणताई महल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती़ दानवे यांनी देशात आता फक्त भाजपाची चलती असल्याचे सांगताना केंद्रासह १३ राज्यात भाजपाचे आणि ४ राज्यात भाजपा आघाडीचे सरकार असल्याचे सांगितले़ त्यामुळे पक्षाचा जनाधार दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगत राज्यातही महिलांना भाजपामध्ये काम करण्यासाठी पुढे आले पाहिजे़ यासाठी पदाधिकाºयांनी पक्षाची ध्येयधोरणे, योजना लोकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहनही त्यांनी केले़ देशात पहिल्यांदा भाजपामध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात आले़ त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा तसेच संसदेतही आरक्षण दिले़ भाजपा महिला आरक्षणात आणखी एक पाऊल टाकण्यास तयार असल्याचे ते म्हणाले़
यावेळी प्रदेशाध्यक्षा अॅड़ नाईक यांनी महिलांचे संघटन करण्यात अडचणी असल्या तरी भाजपा महिला मोर्चा दोन स्तरावर काम करीत असल्याचे सांगितले़ महिलांचे संघटन आणि सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम महिला मोर्चा करीत आहे़ आगामी काळात पक्ष संघटन वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या़ समारोपप्रसंगी जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, शहराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, भाऊराव देशमुख, महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ़ शितल भालके, धनश्री देव, शोभा वाघमारे, अरूंधती पुरंदरे, जि़प़ सदस्या डॉ़ मिनल खतगावकर,वंदना कुलकर्णी, महादेवी मठपती, शततारका पांढरे, गायत्री लकडे आदींची उपस्थिती होती़