नांदेड एमआयडीसीतील ऑईल मिलमध्ये स्फोट; पाच जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 05:24 PM2024-12-01T17:24:35+5:302024-12-01T17:24:56+5:30

यापैकी तिघांची तब्येत चिंताजणक असून या तिघांना छत्रपती संभाजीनगर व मुंबई येथे रेफर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

Blast at oil mill in Nanded MIDC; Five people were seriously injured | नांदेड एमआयडीसीतील ऑईल मिलमध्ये स्फोट; पाच जण गंभीर जखमी

नांदेड एमआयडीसीतील ऑईल मिलमध्ये स्फोट; पाच जण गंभीर जखमी

नांदेड- सिडको भागातील एमआयडीसी परिसरातील तिरूमला ऑईलमध्ये स्फोट झाल्याची घडना रविवारी दुपारी १२.१५ वाजताच्या दरम्यान घडली. या स्फोटामध्ये ऑइलमिलमध्ये असलेले पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

शहराजवळील कवठा भागातील भंगार दुकानाच्या साहित्याला आग लागल्याची घटना ताजी असतानाच रविवारी एमआयडीसी भागातील तिरूमला ऑईल मिलमध्ये भीषण स्फोट होवून मिलला आग लागली. यावेळी ऑईलमिल मध्ये असलेले सुमित बंडेवार ( वय ३९), हर्षद कोतावार ( वय ३०), सुधाकर बंडेवार (वय ६६) व अन्य दोघेजन आगीत गंभीर जखमी झाले. यापैकी गंभीर जखमी असलेल्या वरील तिघांवर शिवाजीनगर येथील खासगी रूग्णालयात तर अन्य दोघांवर कवठा रोडवरील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

यापैकी तिघांची तब्येत चिंताजणक असून या तिघांना छत्रपती संभाजीनगर व मुंबई येथे रेफर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. आगीच्या घटणेची माहिती मिळता महापालिकेच्या दोन अग्निबंब व एमआयडीसीच्या एका अग्निबंबाने दोन तासाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवीले. नेमकी आग कशामुळे लागली आणि नुकसान किती झाले हे अद्याप समजु शकले नाही. आग विझवण्यासाठी आग्निशन दलाचे अधिकारी केरोजी दासरे, उप अग्निशमन अधिकारी कांबळे, फायरमन कदम, शिंदे, ताटे, नरवाडे आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Blast at oil mill in Nanded MIDC; Five people were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.