भाजप ओबीसी आघाडीचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:13 AM2021-06-27T04:13:24+5:302021-06-27T04:13:24+5:30
दरम्यान, खा. प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला ...
दरम्यान, खा. प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली होती. त्याचवेळी मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले; मात्र दुर्दैवाने राज्यात सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारला ते टिकविता आले नाही. म्हणजेच आरक्षण रद्द करण्याचे हे पाप आघाडी सरकारचेच आहे, असा आरोप खा. प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनी केला आहे.
राज्यातील सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजप-ओबीसी आघाडीच्यावतीने २६ जूनरोजी नांदेड ते हैदराबाद महामार्गावरील चंदासिंघ कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, ओबीसी मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष व्यंकटेश जिंदम, चैतन्यबापू देशमुख, डॉ. संतुकराव हंबर्डे, दिलीप कंदकुर्ते, व्यंकट मोकले, शीतल खांडील, अभिषेक सौदे, वैजनाथ देशमुख, धीरज स्वामी, महेश खोमणे, अनिलसिंह हजारे, सुनील मोरे, शंकर वाणेगावकर, प्रा. डॉ. बालाजी गिरगावकर, बालाजी पुयड, शततारका पांढरे, अश्विनी जाधव, चंचलसिंघ जट, सचिन रावका, विश्वांभर शिंदे, शैलेश ठाकूर, दिलीप ठाकूर, नवल पोकर्णा, विजया गोडघासे, रत्नप्रभा गोकुलवाड, लक्ष्मण पांचाळ, सतीश बेरूळकर, संजय घोगरे, नगरसेविका बेबीताई गुपिले, जनार्धन गुपिले, डॉ. देवानंद जाजू, विजय गोगदरे, बजरंग ठाकूर, मनोज जाधव, सुशील चव्हाण, गोपाळ बिसेन, डॉ. शीतलताई भालके, राजन जोजारे, बबलू यादव, राजप्रभू यादव, गोकुळ बिसेन तसेच महेंद्र तरटे,
राजू गोरे, बाळू लोंढे, मिलिंद देशमुख, विजय गंभीरे, अशोक धनेगावकर आदी सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन काही काळाने सोडून दिले.