ध्वज दिनानिमित्त माजी सैनिकांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:19 AM2020-12-06T04:19:01+5:302020-12-06T04:19:01+5:30
आयटीआय उत्तीर्ण असलेल्या व २०२० मध्ये प्रशिक्षणार्थीसाठी १० डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता श्री हजूर साहिब आयटीआय येथे रोजगार ...
आयटीआय उत्तीर्ण असलेल्या व २०२० मध्ये प्रशिक्षणार्थीसाठी १० डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता श्री हजूर साहिब आयटीआय येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, मोटार मेकॅनिक, टर्नर, वेल्डर, डिझेल मेकॅनिक यासह इतर प्रशिक्षण घेतलेले युवक पात्र राहणार आहेत. या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रिपब्लिकन पक्ष खोरिपाची बैठक
रिपब्लिकन पक्ष खोरिपाचे अध्यक्ष अरुण कांबळे लोहगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी आंबेडकर पुतळा येथे अभिवादन सभा घेण्यात येणार आहे. यावेळी हरिभाऊ मांजरमकर, प्रा. अशोकराव ढोले यांची उपस्थिती राहणार आहे.
तालुकाध्यक्षपदी रंगनाथ गजले यांची निवड
बहुजन भारत पार्टीच्या लोहा तालुकाध्यक्षपदी रंगनाथ गजले यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष साहेबराव गुंडिले यांनी त्यांना नियुक्तीचे पात्र दिले. यावेळी बी.एस. गजले, अश्विन कोरे, अरुण गऊळकर यांची उपस्थिती होती.
एक दिवसीय धरणे आंदोलन
नांदेड- केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी कायद्याविराेधात नांदेडात ७ डिसेंबर रोजी संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या उपस्थितीत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
नवीन कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब व इतर राज्यांतील शेतकऱ्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ शीख समाज व जिल्ह्यातील शेतकरी ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती समूह हजूर साथ-संगत श्री हजूर साहिबच्या वतीने देण्यात आली.