नांदेड जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:51 AM2018-06-10T00:51:49+5:302018-06-10T00:51:49+5:30

यंदाचे शैक्षणिक सत्र १५ जून पासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत याचे नियोजन सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून करण्यात आले असून सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.

Books for students on the first day of school in Nanded district | नांदेड जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके

नांदेड जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके

Next
ठळक मुद्देसाडेतीन लाख विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षा अभियानचे नियोजन

विशाल सोनटक्के।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : यंदाचे शैक्षणिक सत्र १५ जून पासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत याचे नियोजन सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून करण्यात आले असून सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. बालकांचा मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम- २००९ नुसार एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच कोणतेही बालक शाळाबाह्य राहणार नाही, यावर भर दिला जात आहे. या अनुषंगानेच जिल्हा परिषद, नगरपालिकांसह खाजगी अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांमध्ये या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार असून यासाठीची पुस्तके बालभारतीच्या डेपोमधून विषयनिहाय तालुका ठिकाणी रवाना केली आहेत. या पुस्तकांचे केंद्रस्तरावरुन शाळांना वितरण करण्यात येत आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ५२ हजार ७६८ विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्याचे नियोजन आहे. यामध्ये बिलोली तालुक्यासाठी मराठी माध्यमाच्या १७,५७३, उर्दू माध्यमाच्या ५२८ आणि सेमी इंग्रजी ४,१०५ अशा १८,१०१ विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येणार आहेत. धर्माबाद- मराठी ९,४०३, उर्दू १२२० आणि सेमी २४४४ असे १०,६२३, नायगाव- मराठी २१,२४३, सेमी इंग्रजी १४६८ अशा २१,२४३, देगलूर- मराठी २३,९३८, उर्दू- १९२७, सेमी इंग्रजी ३,०५६ अशा २५,८६५, नांदेड- मराठी- १९, ३२३, उर्दू ९३५ आणि सेमी २५२ अशा २०,२५८, अर्धापूर- मराठी १२,१०५, उर्दू- २०४२ आणि सेमी ११९६ अशा १४,१४७, मुदखेड- मराठी- १४,५३५, उर्दू- ११७७ आणि सेमी- ६९० अशा १५,७१२, किनवट- मराठी ३०,४६३, उर्दू- १६४३, सेमी- ४,००० अशा ३२,१०६, माहूर- मराठी- १३,०००, उर्दू - ६७७ आणि सेमी- १७९३ अशा १६,६७७, हदगाव- मराठी- ३१,३३७, उर्दू- ९८९, सेमी- ५,३६० अशा ३२३२६ विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येणार आहे तर हिमायतनगर तालुक्यात १३,९३२, मुखेड- ४०,४५५, भोकर-१९,१०२, उमरी-१२,८२१, कंधार- ३०,१३५ तर लोहा तालुक्यातील ३२५,२६५ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.
बालभारतीच्या डेपोमधून विषयनिहाय पुस्तके भरलेल्या गाड्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या असून तेथून त्या केंद्रस्तरावर जाणार आहेत. केंद्रस्तरावरुन संबंधित ठिकाणचे मुख्याध्यापक आपल्या शाळांसाठी पुस्तके घेऊन जातील.
---
इयत्ता पहिली ते आठवीसाठी युडायस पटसंख्येवरुन जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या ३ लाख ५२ हजार ७६८ विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन पद्धतीने पाठ्यपुस्तकांची मागणी तालुकास्तरावरुन आली होती. १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने पुस्तकांचे जिल्हाभरात वितरण सुरू आहे.
-विलास ढवळे
सहा. प्रकल्प अधिकारी
सर्व शिक्षा विभाग

Web Title: Books for students on the first day of school in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.