कृष्णूर येथे धाडसी चोरी 10 तोळे सोन्यासह रोख 80 हजार लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 06:49 PM2017-11-15T18:49:48+5:302017-11-15T18:52:25+5:30

कृष्णूर येथील रहिवासी किशन माणिकराव कमठेवाड यांच्या घरी १४ नोव्हेंबरच्या रात्री धाडसी घरफोडी झाली़ चोरट्यांनी १० तोळे सोन्यासह रोख ८० हजार रुपये लंपास केले.

Brave steal at Krishnoor, with 10 tons of gold and 80,000 lamps in cash | कृष्णूर येथे धाडसी चोरी 10 तोळे सोन्यासह रोख 80 हजार लंपास

कृष्णूर येथे धाडसी चोरी 10 तोळे सोन्यासह रोख 80 हजार लंपास

googlenewsNext
ठळक मुद्देचोरट्यांनी पहाटे २ ते ३ च्या दरम्यान या भागातील डीपीवरून प्रथम लाईट बंद केली़ शेजारील भिंतीवरून गच्चीवर प्रवेश करून पायरीवरून चोरटे घरात शिरले़ घरातील कपाट कुलूप बंद नव्हते़ त्यामुळे सहज चोरट्यांनी त्यातील दागिने व रोख रक्कम हस्तगत केली़

नांदेड : कृष्णूर येथील रहिवासी किशन माणिकराव कमठेवाड यांच्या घरी १४ नोव्हेंबरच्या रात्री धाडसी घरफोडी झाली. चोरट्यांनी १० तोळे सोन्यासह रोख ८० हजार रुपये लंपास केले.

किशन कमठेवाड यांचा मुलगा गोविंद रात्री १० वाजेपर्यंत टीव्ही पाहून वरच्या रुममध्ये झोपला़ तर पत्नी बैठकीच्या रुममध्ये झोपल्या होत्या़ घराचा दरवाजा आतून बंद करून त्याला कुलूपही लावण्यात आले होते़ चोरट्यांनी पहाटे २ ते ३ च्या दरम्यान या भागातील डीपीवरून प्रथम लाईट बंद केली़ त्यानंतर दरवाजाच्या शेजारील भिंतीवरून गच्चीवर प्रवेश करून पायरीवरून चोरटे घरात शिरले़ घरातील कपाट कुलूप बंद नव्हते़ त्यामुळे सहज चोरट्यांनी त्यातील दागिने व रोख रक्कम हस्तगत केली़ त्यानंतर लावलेल्या दरवाजाचे कुलूप काढून चोरटे पसार झाले़ पहाटे ४ च्या दरम्यान कमठेवाड यांच्या पत्नीला जाग आली़ दरवाजा मोकळा पाहून त्यांनी पतीला आवाज दिला़ तेव्हा घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने घेवून रिकाम्या पेट्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत टाकून दिल्या.

या घटनेची माहिती मिळताच कुंटूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला़ नांदेड येथील श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले़ मात्र माग लागला नाही़ कुंटूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला़ सपोनि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. 

Web Title: Brave steal at Krishnoor, with 10 tons of gold and 80,000 lamps in cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड