‘ब्रेक द चेन’चा उद्योगांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:18 AM2021-05-12T04:18:13+5:302021-05-12T04:18:13+5:30

चौकट--------------- परराज्यातील मजूरही परतले गावी जिल्ह्यात औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये परराज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात ...

‘Break the Chain’ also hit the industry | ‘ब्रेक द चेन’चा उद्योगांनाही फटका

‘ब्रेक द चेन’चा उद्योगांनाही फटका

Next

चौकट---------------

परराज्यातील मजूरही परतले गावी

जिल्ह्यात औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये परराज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या ‘ब्रेक द चेन’मध्ये हे मजूर गावाकडे परतले आहेत. राज्यातील लॉकडाऊन पाहता हे मजूर परतण्यास इच्छुक नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे मजुरांची समस्या भागवावी कशी? असा प्रश्न उद्योजकांपुढे आहे.

प्रतिक्रिया------------------

‘ब्रेक द चेन’मध्ये अत्यावश्यक उत्पादन निर्मितीला प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्योगधंदा सुरू असला तरीही वाहतूक व्यवस्था कोलमडली असल्याने कच्चा माल आणण्यात अडचणी येत आहेत. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल नसल्यामुळे उत्पादनाची गती मंदावली आहे. काही अंशी उत्पादनाला मागणी असली तरीही ती वेळेत पूर्ण करणे अवघड जात आहे.

- मारोती कंठेवाड, उद्योजक

औद्योगिक वसाहतीतील कारखान्यामध्ये रोजंदारीवर काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. मात्र आता उद्योगधंदे बंद असल्याने रोजगाराचा प्रश्न उद्‌भवला आहे. काही कारखाने सुरू असले तरीही त्या कारखान्यातील कामगार वेगळे असल्याने आम्हाला तेथे कामावर घेतले जात नाही. त्यामुळे हाताला सध्या काम नाही.

सुरेश वाघमारे, कामगार

गावाजवळच एमआयडीसी असली तरीही नेहमीप्रमाणे आता काम उपलब्ध नाही. कोरोनामुळे वर्षापासून रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीतही पाणी नसल्याने कामे उपलब्ध नाही. या भागातील नागरिकांना आता हाती पडेल ती कामे करावी लागत आहे.

गोविंदराव शिंदे, कामगार.

आपल्या भागातील उद्योग सुरू असले तरीही त्या ठिकाणी आवश्यक असलेली कामे येत नाहीत. जेथे रोजगार मिळत होता तो उद्योग बंद पडला आहे. त्यामुळे पोटा-पाण्याचा प्रश्न उद्‌भवला आहे. बांधकाम मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे.

जितेंद्र जाधव, कामगार

Web Title: ‘Break the Chain’ also hit the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.