अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आर्थिक उलाढालीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:18 AM2021-05-13T04:18:00+5:302021-05-13T04:18:00+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेकांनी लग्नकार्य तसेच अन्य कामाचा मुहूर्त पुढे ढकलला आहे. त्यामुळे कार्यक्रमच रद्द ...

A break to financial turnover at the moment of Akshay III | अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आर्थिक उलाढालीला ब्रेक

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आर्थिक उलाढालीला ब्रेक

Next

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेकांनी लग्नकार्य तसेच अन्य कामाचा मुहूर्त पुढे ढकलला आहे. त्यामुळे कार्यक्रमच रद्द झाल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

शहरात दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सराफा बाजारात माेठी गर्दी असते. तसेच वाहन खरेदीसाठीही अनेकांची लगबग असते; मात्र यंदा बाजारपेठेत शांतता पसरली आहे.

चौकट- कोरोनामुळे आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. सणोत्सवाद्वारे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल होत असते; मात्र कोरोनामुळे मागील वर्षापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक नागरिक विविध वस्तू खरेदी करतात. परंतु यंदाही हा मुहूर्त हुकला आहे. - शंकर केशटवार, व्यापारी.

चौकट- कोरोनामुळे शासनाने लग्न सोहळ्यांना नियम घालून दिले आहेत. त्यानुसार अत्यल्प माणसांच्या उपस्थितीत लग्न सोहळे होत आहेत. त्यामुळे लग्नसराईवर अवलंबून असलेले छोटे मोठे व्यवसाय कोलमडले आहेत. या व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. - अमर नेरलकर, मंगल कार्यालय, प्रमुख.

चौकट-लग्नसराईमुळे सराफा बाजार तेजीत असतो. जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नांदेडच्या सराफा बाजारात गतवर्षीप्रमाणेच यंदाही मंदी आहे. लग्नसोहळे होत नसल्याने या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या सोने, चांदी खरेदीच्या उलाढालीला ब्रेक बसला आहे.

Web Title: A break to financial turnover at the moment of Akshay III

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.