लाचखोरीत नांदेड दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 11:55 PM2018-02-15T23:55:42+5:302018-02-15T23:57:32+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी महिन्यात कारवाई करत तब्बल १०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सर्वाधिक महसूल विभागातील कर्मचारी असून त्या पाठोपाठ पोलीस आणि प्रशासनाचा क्रमांक लागतो. सर्वाधिक १५ सापळे पुणे परिक्षेत्रात तर त्या पाठोपाठ नांदेड परिक्षेत्रात १३ सापळे टाकून कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी महिन्यात कारवाई करत तब्बल १०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सर्वाधिक महसूल विभागातील कर्मचारी असून त्या पाठोपाठ पोलीस आणि प्रशासनाचा क्रमांक लागतो. सर्वाधिक १५ सापळे पुणे परिक्षेत्रात तर त्या पाठोपाठ नांदेड परिक्षेत्रात १३ सापळे टाकून कारवाई करण्यात आली.
शासकीय कामासाठी लाच मागणाºया विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येते. मात्र त्यानंतरही या गुन्ह्यांच्या प्रमाणात कमी झालेली नसल्याचेच ही आकडेवारी सांगते. जानेवारी २०१८ मध्ये राज्यात लाचलुचपत विभागाच्या वतीने ७९ सापळे रचण्यात येऊन १०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सापळ्यांमध्ये महसूल विभागाशी संबंधित १९, पोलीस आणि पंचायत समिती विभागाचे प्रत्येकी १६, वीज वितरण कंपनीचे ६, वन विभाग ४, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग प्रत्येकी ३, सहकार, नगरपरिषद, कृषी आणि बांधकाम विभाग प्रत्येकी २ तर महानगरपालिका, शिक्षण, जलसंपदा, अन्न व औषध प्रशासन या विभागांतील प्रत्येकी एक कारवाईचा समावेश आहे.
या ७९ सापळ्यांच्या प्रकरणांमध्ये राज्यात तब्बल १ कोटी ९१ लाख ७ हजार इतकी रक्कम जप्त करण्यात आली असून या कारवाईत वर्ग-१ च्या ५ तर वर्ग-२ च्या ८ अधिकाºयांचाही समावेश आहे. कारवाई झालेल्यामध्ये तृतीय श्रेणीतील तब्बल ६५ कर्मचारी असल्याचेही आकडेवारीवरुन स्पष्ट होते. परिक्षेत्रनिहाय कारवाईची आकडेवारी पाहिली असता सर्वाधिक १५ सापळे पुणे परिक्षेत्रात लावण्यात आले असून त्या पाठोपाठ १३ सापळे नांदेड परिक्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावले. अमरावतीमध्ये १२, ठाणे ११, नागपूर १०, नाशिक ८, औरंगाबाद ६ तर मुंबई परिक्षेत्रात जानेवारी महिन्यामध्ये ४ सापळे रचून लाचखोरांवर कारवाई करण्यात आली.
लोकसेवकांसह खाजगी व्यक्तीही जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जानेवारी २०१८ मध्ये लाचखोरीच्या ७९ प्रकरणामध्ये कारवाई करीत १०० अधिकार-कर्मचाºयांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ९ लोकसेवक आणि ९ खाजगी व्यक्तींचाही समावेश आहे. अपसंपदा प्रकरणांची माहिती घेतली असता जानेवारी महिन्यात अपसंपदेचे राज्यात ४ प्रकरणे दाखल झाली आहेत. यात वर्ग-१, वर्ग-२ व वर्ग-३ च्या प्रत्येकी एका कर्मचाºयाचा समावेश असून एका लोकसेवकासोबतच चार खाजगी व्यक्तींविरुद्धही अपसंपदाप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.