लोहयात बहीण-भावात लढत; आशा शिंदे यांचा सामना प्रतापराव चिखलीकर यांच्याशी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 02:23 PM2024-11-05T14:23:48+5:302024-11-05T14:24:23+5:30

आशा शिंदे आणि प्रतापराव चिखलीकर हे बहीण-भाऊ आहेत यामुळे हि लढत लक्षणीय होणार आहे.

Brother-sister Asha Shinde vs Prataprao Chikhlikar fight in Loha | लोहयात बहीण-भावात लढत; आशा शिंदे यांचा सामना प्रतापराव चिखलीकर यांच्याशी

लोहयात बहीण-भावात लढत; आशा शिंदे यांचा सामना प्रतापराव चिखलीकर यांच्याशी

लोहा : लोहा मतदारसंघात शेकापचे विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे, तसेच उद्धवसेनेचे एकनाथ पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आशा शिंदे आणि प्रतापराव चिखलीकर हे बहीण-भाऊ आहेत यामुळे हि लढत लक्षणीय होणार आहे.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार उभा करणार असल्याचे जाहीर केले होते. लोहा विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे यांच्याकडून अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे भावी आमदारांचा हिरमोड झाला आहे. मतदारसंघात ‘कही खुशी, कही गम’ असल्याचे प्रकार दिसत आहे. 

विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी अजितदादा गट, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र राज्य समिती, सेवा जनशक्ती पार्टी, बहुजन वंचित आघाडी, ओबीसी आघाडी यांच्यासह मनोज जरांगे यांच्याकडून दोन ते तीन अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे मनोज पाटील यांच्या समर्थकांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामध्ये पुरुषोत्तम धोंडगे, रंगनाथ भुजबळ, संभाजी उमरेकर, मोहन सिरसाट यांच्यासह १९ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे लोहा विधानसभा मतदारसंघात गणित बदलणार का, हे आगामी काळात कळणार आहे.

हे आहेत उमेदवार: 
एकनाथ रावसाहेब पवार- शिवसेना (उ.बा.ठा.)

चिखलीकर प्रतापराव गोविंदराय- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी

आशाबाई श्यामसुंदर शिंदे- पिझन्ट्स अॅड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया

चंद्रसेन ईश्वर पाटील- जनहित लोकशाही पार्टी

शिवकुमार नारायणराव नरंगले- वंचित बहुजन आघाडी

सुभाष भगवान कोल्हे- संभाजी ब्रिगेड पार्टी •

आशा श्यामसुंदर शिंदे- अपक्ष

एकनाथ जयराम पवार- अपक्ष

पंडित सुदाम वाघमारे- अपक्ष

प्रकाश दिगंबर भगनुरे- अपक्ष

बालाजी रामप्रसाद चुकलवाड- अपक्ष

प्रा. मनोहर बाबाराव धोंडे- अपक्ष

सुरेश प्रकाशराव मोरे- अपक्ष

संभाजी गोविंद पवळे- अपक्ष

Web Title: Brother-sister Asha Shinde vs Prataprao Chikhlikar fight in Loha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.