केंद्राचे बजेट म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:08 AM2021-02-05T06:08:01+5:302021-02-05T06:08:01+5:30
अध्यक्ष, गोदावरी समूह, नांदेड. सर्वसामान्यांना सरकारने दाखविला ठेंगा नांदेड- अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केवळ आकडेमोडीचा खेळ खेळला आहे. मात्र, कोविडसाठी ...
अध्यक्ष, गोदावरी समूह, नांदेड.
सर्वसामान्यांना सरकारने दाखविला ठेंगा
नांदेड- अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केवळ आकडेमोडीचा खेळ खेळला आहे. मात्र, कोविडसाठी २० लाख कोटींचे पॅकेज सरकारने जाहीर केले होते. त्या पॅकेजचे पुढे काय झाले? याचा कोणालाही अजूनपर्यंत पत्ता लागलेला नसल्याने या आकडेमोडीवर विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न निर्माण होतो. सरकारच्या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्य नागरिक मध्यमवर्गीयांची मोठी निराशा झाली आहे. आयकरामध्ये काही सूट मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या वर्गाची निराशा झाली आहे. अगोदरच इंधनाचे दर वाढलेले आहेत. त्यात एक्साइज ड्यूटी आणखी वाढविल्याने इंधनाचे दर भडकतील. पर्यायाने महागाई वाढणार आहे. एकूणच सर्वार्थाने निराश करणारे हे बजेट असून, या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिकांना सरकारने ठेंगा दाखविला आहे.
-डी.पी. सावंत, माजी मंत्री
सर्वसमावेशक अर्थसंकल्पामुळे दिलासा
नांदेड- कोरोना संकटामुळे देशातील विविध क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटकाळात विविध क्षेत्रांना उभारी देणारा अर्थसंकल्प म्हणून या बजेटकडे पाहिले पाहिजे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. याची जाणीव ठेवून शेती क्षेत्राला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत. एमएसपीमध्ये दीडपट वाढ केलेली घोषणा हा त्याचाच भाग आहे. याबरोबरच उद्योग क्षेत्राकडेही सरकारने लक्ष दिल्याने आगामी काळात नोकरीच्या संधी वाढतील. मजुरांना अन्न सुरक्षा योजना, लघुसिंचन प्रकल्प, रस्त्यांसाठी विशेष तरतूद यामुळे ग्रामीण भागाच्या विकासालाही गती मिळेल. एकूणच सर्वसमावेश अर्थसंकल्पामुळे सर्वच घटकांना दिलासा मिळाला आहे.
शिवप्रसाद राठी, भाजपा उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेश