जनता कॉलनी भागात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:18 AM2021-03-27T04:18:13+5:302021-03-27T04:18:13+5:30
भोपाळवाडी येथे घरासमोरुन दुचाकी लंपास लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे घरासमोरुन दुचाकी लंपास करण्यात आली. ही घटना २३ मार्च रोजी ...
भोपाळवाडी येथे घरासमोरुन दुचाकी लंपास
लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे घरासमोरुन दुचाकी लंपास करण्यात आली. ही घटना २३ मार्च रोजी घडली. जीवन विश्वनाथ भोपळे यांची एम.एच.२६, ५८२१ या क्रमांकाची दुचाकी घरासमोर उभी केली होती. २५ हजार रुपये किमतीची ही दुचाकी लांबविण्यात आली. या प्रकरणात उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शेतकरी कुटुंबाला जबर मारहाण
मुदखेड तालुक्यातील मौजे डोणगाव येथे किरकोळ कारणावरुन शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना २४ मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणात मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दिगांबर कोंडीबा हेमके हे मुलगा राजेश आणि सुनेसह शेतात काम करीत होते. त्याचवेळी आरोपी त्या ठिकाणी आला. हेमके याने माझ्या शेतातील बोअरचे वायर का काढून फेकले म्हणून आरोपीला जाब विचारला. त्याचा राग मनात धरुन आरोपीने तिघांनाही बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ. बाचेवाड हे करीत आहेत.
गवळणीच्या कार्यक्रमात एकाला मारहाण
मुखेड तालुक्यातील मौजे गवळेवाडी येथे श्री कृष्ण मंदिरात सुरु असलेला गवळणीचा कार्यक्रम ऐकत बसलेल्या एकाला आठ ते दहा जणांनी जबर मारहाण केली. ही घटना २४ मार्च रोजी घडली.
अंकुश हणमंतराव कल्याणकर हे श्रीकृष्ण मंदिराच्या ओट्यावर गवळणीचा कार्यक्रम ऐकत बसले होते. यावेळी आठ ते दहा जण त्या ठिकाणी आले. त्यांनी कल्याणकर यांना ओट्यावरुन खाली ओढत मारहाण केली. त्यात कल्याणकर यांची पत्नी आणि मेव्हणा भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला असता त्यांनाही मारहाण झाली. यावेळी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन गहाळ झाले. या प्रकरणात मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोउपनि वाघमारे हे करीत आहेत.
लॉकडाऊन तोडले, चालकावर गुन्हा
नरसी ते मुखेड रस्त्यावर काळीपिवळीत प्रवाशांना बसवून मास्क न घालता जोरजोराने ओरडणाऱ्या एका चालकावर रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. २५ मार्च राेजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास चालकाने काळीपिवळीत प्रवाशी बसविले होते. त्यानंतर आणखी प्रवाशी मिळावेत म्हणून मास्क न वापरता जोरजोराने ओरडत होता.