परजिल्ह्यातील बससेवा सुरू, प्रवासी मात्र फिरकेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:18 AM2021-03-26T04:18:17+5:302021-03-26T04:18:17+5:30

जिल्ह्याबाहेर सुरू असलेल्या बसेसमध्ये नांदेड आगारातून पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, शेगाव, हैदराबाद, बिदर आणि अकोल्यासाठी बसेस धावत आहेत. त्याचबरोबर ...

Bus service resumes in the district, but passengers do not turn around | परजिल्ह्यातील बससेवा सुरू, प्रवासी मात्र फिरकेनात

परजिल्ह्यातील बससेवा सुरू, प्रवासी मात्र फिरकेनात

googlenewsNext

जिल्ह्याबाहेर सुरू असलेल्या बसेसमध्ये नांदेड आगारातून पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, शेगाव, हैदराबाद, बिदर आणि अकोल्यासाठी बसेस धावत आहेत. त्याचबरोबर किनवट आगारातून नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, मुखेडमधून सोलापूर, शिंगणापूर, पुणे, देगलूर आगारातून हैदराबाद, पंढरपूर, सोलापूर, कंधार आगारातून आळंदी, हदगावमधून अकोला, माहूर आगारातून शेगाव, अमरावती, नागपूरसाठी बसेस सोडण्यात येत आहेत. सदर बसेस ठरलेल्या मार्गावरून धावत आहेत.

बसमध्ये प्रवास करताना प्रवाशांना मास्क वापरणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या विविध नियमांचे कर्मचारी तसेच प्रवाशांनी पालन करणे बंधनकारक असल्याच्या सूचना विभाग नियंत्रकांनी दिल्या आहेत.

सुरक्षेबरोबरच उत्पन्नावरही लक्ष द्या

संचारबंदी कालावधीत कोरोना नियमावली पाळून सुरक्षेवर विशेष लक्ष द्यावे त्याचबरोबर सदर कालावधीत चालविण्यात येणार्या बसफेर्यामध्ये प्रवाशांचा प्रतिसाद पाहूनच चालविण्यात याव्यात, कुठल्याही परिस्थितीत साध्या फेर्यांचे कमीत कमी प्रति किमी उत्पन्न २२ रूपयेपेक्षा कमी व शिवशाही फेर्यांचे ३०रूपयांपेक्षा कमी येणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. तसेच यापेक्षा उत्पन्न कमी होत असेल तर सदर फेर्या तत्काळ बंद करण्यात याव्यात, अशा सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर बस मार्गावर पाठवत असताना प्रत्येकवेळी निर्जंतुकिकरण करूनच मार्गावर सोडावी.

Web Title: Bus service resumes in the district, but passengers do not turn around

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.