लाॅकडाऊनच्या जाचक अटी रद्द करा अन्यथा वंचितच्या वतिने मोर्चा काढण्यात येईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:18 AM2021-04-07T04:18:18+5:302021-04-07T04:18:18+5:30
शहर व जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपापले दुकाने व प्रतिष्ठाने उघडी ठेवण्याची मुभा देण्यात ...
शहर व जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपापले दुकाने व प्रतिष्ठाने उघडी ठेवण्याची मुभा देण्यात यावी.नांदेड शहर व जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव गल्ली स्तरापर्यंत वाढलेला असून प्रत्येक दोन ते तीन घरांच्या मागे एक रुग्ण आढळून येत आहे त्या तुलनेने शासन आणि प्रशासनाच्या वतीने आरोग्य सुविधा देण्यामध्ये शासन अपयशी पडत आहे त्यामुळे नांदेड येथे स्टेडियम अथवा आय टी एम कॉलेज किंवा इतर कोणतेही महाविद्यालय व मोठ्या इमारती ताब्यात घेऊन तात्काळ एक हजार रुग्णाचे 2 जम्बो हॉस्पिटल नांदेड येथे सुरू करण्यात यावे व तेथे किमान दोनशे ते तीनशे आयसीयू बेड आणि किमान दोनशे ते तीनशे ऑक्सिजनचे पेड या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटल मधल्या आयसीयू मधील ५० टक्के बेड हे सर्वसामान्य लोकांसाठी आरक्षित करून महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार देण्याची व्यवस्था करण्यात यावी खाजगी हॉस्पिटल व खाजगी जनरल प्रॅक्टिशनर यांना कोरोनाचे रुग्ण तपासण्याची व रेमडिसीव्हीर इंजेक्शन स्तराच्या ट्रीटमेंट करण्याची मुभा देण्यात यावी व नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व मेडिकल स्टोअर्स ला रेमडिसीव्हीर चे इंजेक्शन उपलब्ध करून विकण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरून या इंजेक्शनची काळाबाजारी होणार नाही व सर्वत्र हा इंजेक्शन उपलब्ध होईल येत्या दहा तारखेपर्यंत मोठ्याप्रमाणावर व्हॅक्सिनेशनचे नियोजन करून जेजे दुकानदार आप-आपल्या परिवारातील पंचेचाळीस वर्षे वयाच्या वरील सदस्यांना व्हॅक्सिनेशनचे करून घेतील त्यांना ब्रेक द चैन या लॉकडाऊन मधून मुक्त करण्यात यावे व महानगरपालिकेचे अथवा खाजगी शाळा घेऊन तेथे ऑक्सिजन बेड सहित आयसोलेशन केंद्र उभारावे व महानगरपालिकाचे जेवढे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तेथे कोवीड हॉस्पिटल व्हेंटिलेटर ऑक्सिजन सहित या सुविधा देऊन सुरू करण्यात यावे व मुबलक प्रमाणामध्ये रेमडिसीव्हीर सहित सर्व औषध गोळ्यांचे पुरवठा करण्यात यावा
तसेच नांदेड शहरातील पिवळ्या आणि केशरी राशन कार्ड असलेल्या व नसलेल्या सर्व गरजूंना साखर तेल सहित सर्व राशन किमान दोन महिन्याचे दर्जेदार राशन मोफत व घरोघरी कीट निहाय वाटप करण्यात यावे.
कोवीड नियमांना अधीन राहून नांदेड शहरातील सलून दुकानदारांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी तसेच चहाच्या टपऱ्या छोट्या-छोट्या हॉटेल रेस्टॉरंट यांनाही नियमाच्या अधीन राहून सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी.
निवेदनावर गोविंद दळवी फारुक अहमद डॉ. संघरत्न कु-हे, प्रशांत इंगोले, शिवा नरंगले विठ्ठल गायकवाड अयुब खान साहेबराव बेळे, श्याम कांबळे, ॲड शेख बिलाल, उत्तम धर्मेकर इत्यादींच्या स्वाक्षर्या आहेत.