...तर प्रस्ताव रद्द करु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:26 AM2018-03-01T00:26:43+5:302018-03-01T00:27:33+5:30
महापालिकेच्या वतीने डम्पिंग ग्राऊंडवर झाडे लावण्यात येणार आहे. याबाबत कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. डम्पिंग ग्राऊंडवर झाडे येतील कसे? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या सर्व प्रकाराची माहिती घेऊन प्रस्तावात चुकीचे आढळल्यास तो रद्द करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी मांडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेच्या वतीने डम्पिंग ग्राऊंडवर झाडे लावण्यात येणार आहे. याबाबत कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. डम्पिंग ग्राऊंडवर झाडे येतील कसे? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर या सर्व प्रकाराची माहिती घेऊन प्रस्तावात चुकीचे आढळल्यास तो रद्द करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी मांडली आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहाने अमृत योजनेअंतर्गत हरित क्षेत्र विकासासाठी प्राप्त साडेचार कोटींच्या निधीतून शहरातील विविध भागात झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात चक्क जुन्या नांदेडातील देवीनगर येथील डम्पिंग ग्राऊंडच्या सात एकर जागेवरही झाडे लावण्याचा प्रस्ताव आहे. डम्पिंग ग्राऊंडवर झाडे येतील कसे? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत ‘लोकमत’नेही २८ फेब्रुवारीच्या अंकात वृत्त प्रकाशित करुन हा प्रस्ताव कोणत्या हेतूने पारित केला आहे? याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
बुधवारी याविषयी खा. चव्हाण यांच्याशी संवाद साधला असता या प्रस्तावाबाबत माहिती नसल्याचे सांगितले. असे काही असेल तर त्याबाबत माहिती घेऊ. चुकीचे काही असेल तर तो प्रस्ताव रद्द करु, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यारंभ आदेशही दिल्याचे सांगितले असता ते रद्द करणे कोणती मोठी बाब आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे एकूणच शहराला प्राप्त निधीच्या विनियोगाबाबत खा. चव्हाण यांनी लक्ष घातल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, या विषयात स्थायी समितीच्या काही सदस्यांनी उघड विरोध केला आहे. मात्र या विरोधाला डावलून कार्यारंभ आदेश देण्यात आले होते.
इतकेच नव्हे, तर सर्वात कमी दर असलेल्या ठेकेदारास अपात्र ठरवत दुसºया क्रमांकाचे दर असलेल्या ठेकेदाराला हे काम बहाल करण्यात आले आहे.
डम्पिंग ग्राऊंडवर लावण्यात येणाºया झाडांची संख्या आणि प्रत्यक्ष जागा याचाही कुठे ताळमेळ लागत नाही. दोन झाडांमधील अंतर किमान दोन फूट तरी असणे आवश्यक आहे.
आता नाईकनगरबाबतही प्रश्नचिन्ह
डम्पिंग ग्राऊंडवरील झाडे लावण्याचा विषय चर्चेला आला असतानाच आता नव्याने नाईकनगर येथे जागेवर लावण्यात येणाºया झाडाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नाईकनगर येथील जागा एका बाजूने पूर्णत: मोकळी आहे. झाडे लावल्यानंतर त्या झाडांचे रक्षण कसे करायचे? कोण करणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. एकूणच हरित क्षेत्र विकासासाठीच्या साडेचार कोटींच्या निधीतून होणारी कामे ही वादातच सापडली आहेत. गोदावरी किनाºयावरील डंकीन पंपहाऊसवरही नैसर्गिकरित्या इतकी झाडे असताना नव्याने झाडे लावण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला आहे.