जिल्हाभरात कॅन्डल मार्च काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:34 AM2020-12-12T04:34:38+5:302020-12-12T04:34:38+5:30
बिलोली या शहरात ९ डिसेंबर रोजी मूकबधिर दिव्यांग मुलीवर काही नराधमांनी अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली ...
बिलोली या शहरात ९ डिसेंबर रोजी मूकबधिर दिव्यांग मुलीवर काही नराधमांनी अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली आहे. याच्याच निषेधार्थ कमल फाऊंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती नांदेडकडून १० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात, संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी ही घटना आहे. दिव्यांग सुधारित कायदा २०१६ आणि त्या कायद्यातील सर्व कलमे हे कागदावरच असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झालेली नसल्यामुळेच दिव्यांगांवर असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा होणार नाही तोवर यावर आळा बसणार नाही, त्यामुळे नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा जिल्हाभरात कॅन्डल मार्च काढत उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर राहुल साळवे, अमरदीप गोधने, प्रदीप हणवते, नागनाथ कामजळगे, कार्तिक भरतीपुरम, सय्यद आरीफ, राजू इराबत्तीन, संजय सोनुले, मनोहर पंडित, प्रशांत हणमंते, नागेश निरडी, विश्वनाथ सातोरे आणि गणेश मंदा इल्लया यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.