कार-दुचाकीची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 12:17 PM2024-09-18T12:17:34+5:302024-09-18T12:17:58+5:30

धडक इतकी भीषण होती की कारचा समोरील भाग आणि दुचाकीचा चकनाचुर झाला आहे.

Car-bicycle head-on collision; Two died on the spot in a terrible accident | कार-दुचाकीची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

कार-दुचाकीची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

- मारोती चिलपिपरे
कंधार ( नांदेड) :
बिदर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर कंधार तालुक्यातील दिग्रस (बु.) गावाजवळ मंगळवारी सायंकाळी एसयुव्ही कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड-बिदर राष्ट्रीय महामार्गावरुन जांब येथून येणाऱ्या दुचाकीस ( एमएच २६ बीबी ०४९ ) नांदेड जांब मार्गे जाणाऱ्या कारने ( एमएच २६ सीएच ७८६२ ) दिग्रस (बु) गावाजवळ जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दत्तात्रय लिंगोजी मानसपुरे (६५ वर्ष, रा. मानसपुरी ता कंधार )  आणि शेख मगदूम शेख कासिम (४७, दर्गापुरा, कंधार ) हे दोघे जागीच ठार झाले. 

धडक इतकी भीषण होती की कारचा समोरील भाग आणि दुचाकीचा चकनाचुर झाला आहे. माहिती मिळाल्यानंतर कंधार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

Web Title: Car-bicycle head-on collision; Two died on the spot in a terrible accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.