कार अन् ट्रॅक्टर अपघातात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कॅशियरचा मृत्यू, तीन कर्मचारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 12:47 PM2024-06-29T12:47:32+5:302024-06-29T12:48:42+5:30
नांदेड ते लातूर राष्ट्रीय महामार्गावर लांडगेवाडी परिसरात झाला अपघात
- गोविंद कदम
लोहा: लांडगेवाडी परिसरात नांदेड- महामार्गावर चारचाकी आणि ट्रॅक्टरची शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास जोरदार धडक झाली. यात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत. प्रशिल सुनिल बागडे (३२ रा.नागपुर ) असे मृताचे नाव आहे. मृत आणि जखमी चौघेही माळाकोळी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेची कर्मचारी असल्याची माहिती आहे. मृत बागडे हे बँकेत कॅशियर होते.
नांदेड ते लातूर राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माळाकोळी येथील चार कर्मचारी शुक्रवारी रात्री एका हॉटेलवर जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर नांदेडकडे जात असताना रात्री बारा वाजेच्या सुमारास लांडगेवाडी परिसरात त्यांच्या चारचाकीचा ( एम .एच २४ ए.फ.६६१७) आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच माळाकोळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्या पथकाने अपघातस्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना माळाकोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून प्रशिल बागडे यास मृत घोषित केले. तर इतर तिघांना प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात रवाना आले.