आधुनिकतेची जोड देऊन मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:18 AM2021-01-25T04:18:26+5:302021-01-25T04:18:26+5:30

या पंधरवाडा काळात मराठी चारोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, मराठी हस्ताक्षर स्पर्धा गुगल मीटच्या साहाय्याने घेण्यात आल्या. समारोपाच्या प्रसंगी डॉ. ...

Celebrate Marathi language conservation fortnight by adding modernity | आधुनिकतेची जोड देऊन मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा

आधुनिकतेची जोड देऊन मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा

Next

या पंधरवाडा काळात मराठी चारोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, मराठी हस्ताक्षर स्पर्धा गुगल मीटच्या साहाय्याने घेण्यात आल्या. समारोपाच्या प्रसंगी डॉ. दीपक कासराळीकर यांचे मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर व्याख्यान ऑनलाइन पद्धतीने आयोजीत करण्यात आले होते. तंत्रज्ञान घेणारे विद्यार्थी मराठी भाषेच्या विविध स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. यासाठी ऑनलाइन पद्धतीने पुढाकार घेतल्याबद्दल डॉ.कासराळीकर यांनी संस्थेचे प्राचार्य व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करणाऱ्या समितीचे स्वागत केले.

प्राचार्य डॉ.गोरक्ष गर्जे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दरवर्षी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागाने विविध स्पर्धा घेऊन मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येतो, पण या वर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या सहभागाचे मोठे आव्हान होते. निबंध स्पर्धेसाठी २४ स्पर्धक, हस्ताक्षर स्पर्धेसाठी ५३ स्पर्धक, चारोळी स्पर्धेसाठी १० स्पर्धक आणि मराठी व्याख्यानासाठी दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने आपला सहभाग नोंदविला. याप्रमाणे, मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात आला, असे ते म्हणाले. ऑनलाइन पद्धतीने मराठी भाषासंवर्धन पंधरवाडा यशस्वी करण्यासाठी समन्वयक प्रा.सं. रा. मुधोळकर, सहायक समन्वयक डॉ.अ.अ. जोशी, प्रा.अ.नं. यादव, निबंध स्पर्धेसाठी डॉ. दे. ग. कोल्हटकर, प्रा. स. पू. राठोड, हस्ताक्षर स्पर्धेसाठी डॉ. ग. मा. डक, डॉ. सं. वि. बेट्टिगेरी, चारोळी स्पर्धेसाठी प्रा.सा. ग. दुटाळ व्याखान आयोजित करण्यासाठी प्रा. अ. बा. दमकोंडवार व प्रा. वि. मं. नागलवार सहायक म्हणून सं. र. जगताप व शेख जावेद यांनी प्रयत्न केले.

Web Title: Celebrate Marathi language conservation fortnight by adding modernity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.