रेल्वे लेव्हल क्रॉसिंग जागरूकता दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:31+5:302021-06-11T04:13:31+5:30
दक्षिण मध्य रेल्वेने अत्युच्च दर्जाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मानवरहित लेव्हल क्रॉसिंगचे रूपांतर मानव-संचलित क्रॉसिंगमध्ये परिवर्तित करणे आणि पुलाखालील भुयारी ...
दक्षिण मध्य रेल्वेने अत्युच्च दर्जाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मानवरहित लेव्हल क्रॉसिंगचे रूपांतर मानव-संचलित क्रॉसिंगमध्ये परिवर्तित करणे आणि पुलाखालील भुयारी रस्ता, पुलावरील रस्ते, मर्यादित उंचीचे भुयारी रस्ते तयार करणे यासारख्या पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत. तसेच लेव्हल क्रॉसिंगवरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षिततेचे विविध उपाय केले आहेत. यात नांदेड रेल्वे सुरक्षा विभागाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी ने के. सूर्यनारायणा यांच्या नेतृत्वात इंजिनिअरिंग विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात आले. दरम्यान, जागरूकतेसाठी जवळपास चार लाख रस्ता वापरकर्त्यांना एसएमएसच्या माध्यमातून रेल्वे गेट पार करताना योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे क्राॅसिंगच्या जवळ असलेल्या गावांमध्ये जाऊन सुरक्षेसंबंधी घोषणा देऊन जनजागृती, विविध रेल्वे गेटवर छापील माहिती पत्रकांचे वाटप, रेल्वे गेटवर पोस्टर लावून जनजागृती यासह विविध उपक्रम राबविण्यात आले.