वन्यजीव दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:18 AM2021-03-05T04:18:30+5:302021-03-05T04:18:30+5:30
कुंडलवाडी पालिकेची मोहीम कुंडलवाडी : येथील नगरपालिकेने मालमत्ता कर, पाणीकर वसुली मोहीम जोरात सुरू केली आहे. २४ लाखांच्या थकबाकी ...
कुंडलवाडी पालिकेची मोहीम
कुंडलवाडी : येथील नगरपालिकेने मालमत्ता कर, पाणीकर वसुली मोहीम जोरात सुरू केली आहे. २४ लाखांच्या थकबाकी वसुलीसाठी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी मोहीम उघडली असून, यामध्ये मोहन कपाळे, शंकर जायवाड, मारोती करपे, जनार्दन मोरे, गंगाधर बस्सापुरे, गंगाधर बिल्लावार आदींनी सहभाग नोंदवला.
टेनिस बॉल क्रिकेट सामने
लोहा : येथील सहारा स्टेडियमवर नगराध्यक्ष चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी केले. यावेळी उपनगराध्यक्ष शरद पाटील, बबनराव निर्मले, केशवराव कदम, बालाजी खिल्लारे, करीम शेख, अमोल व्यवहारे, पंचशील कांबळे, संभाजी पाटील, भास्कर पाटील, केतन खिल्लारे, यशपाल निर्मले, मौलाना अकबर आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी अनिल धूतमल, सतीश निखाते, खंडू पाटील आदी परिश्रम घेत आहेत.
कठोर कारवाई करा
लोहा : जामगा शिवणी प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी रिपाइं (गवई) गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष भगवान ढगे, उपाध्यक्ष दीपक सातोरे, पुंडलिकराव कांबळे, सचिव राहुल बनसोडे, सदस्य सुरेशराव हटकर, भगवान कापुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मराठी दिन साजरा
नायगाव : कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्म दिवसानिमित्त ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, खैरगाव येथे मराठी गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला पांचाळ, अनुसया, जयमाला, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव कुमुदकांत पटेल व प्राचार्य सुजीत देशपांडे यांनी स्वागत केले.
पाणंद रस्त्याचे भूमिपूजन
नायगाव : कुंटूर येथील पाणंद रस्त्याचे भूमिपूजन नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी मारोतराव कदम, सदस्य सूर्यकांत कदम, बालाजी पवार, तंटामुक्त अध्यक्ष लक्ष्मण अडकिणे, वसंत होळकर, मंडळ अधिकारी शेख, तलाठी करोडवाड, ग्रामसेवक दमकोंडवार आदी उपस्थित होते.
विजेच्या धक्क्याने मृत्यू
नांदेड : तालुक्यातील फत्तेपूर लालवाडी येथील २१ वर्षीय तरुणी विजेच्या तारावर वायर टाकून जोडणी घेत असताना शॉक लागून मरण पावल्याची घटना १ मार्च रोजी सकाळी घडली. अनिता संगम जाधव असे मयत युवतीचे नाव आहे. ग्रामीण पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली. पोलीस उपनिरीक्षक गोविंद खैरे अधिक तपास करीत आहेत.