जागतिक दिव्यांग दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:28 AM2020-12-05T04:28:29+5:302020-12-05T04:28:29+5:30
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामराव मंगनाळे हे उपस्थित होते, तर दिव्यांग बांधव गफार शेख, सादख शेख, अखिल बिछू, मगदूम ...
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामराव मंगनाळे हे उपस्थित होते, तर दिव्यांग बांधव गफार शेख, सादख शेख, अखिल बिछू, मगदूम शेख, विकास जाधव, विठ्ठल जाधव, हणमंत जाधव, सई हात्ते, मुक्तेश्वर मंगनाळे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित दिव्यांग बंधू, भगिनींचा पुष्पहार घालून गौरव करण्यात आला. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी यावर्षीचा ३% चा ग्रामपंचायतीचा निधी मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली असता त्यांच्या अडीअडचणीसाठी वेळोवेळी पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही देण्यात आली.
याप्रसंगी फुलवळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बालाजी देवकांबळे, प्रहार जनशक्तीचे कंधार तालुका अध्यक्ष प्रवीण ऊर्फ सागर मंगनाळे, धोंडिबा बोरगावे, कामन मंगनाळे, आनंद पवार, नागेश सादलापुरे, उमाकांत मंगनाळे, जिलानी शेख, रमजान शेख, इसाख शेख, संदीप मंगनाळे, दीपक हात्ते व मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव उपस्थित होते.
रामतीर्थचे सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांची तडकाफडकी बदली
नरसी फाटा : दीड वर्षांपूर्वी रामतीर्थ पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांची अचानक दि. ३ डिसेंबर रोजी तडकाफडकी बदली झाली असून त्यांच्या जागी रात्री उशिरा राजसाहेब मुत्येपोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांच्या तडकाफडकी बदलीमागे चार दिवसांपूर्वी एसीबीचा पडलेला ट्रप कारणीभूत असल्याची चर्चा होत आहे.
मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रामतीर्थ पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांच्या तडकाफडकी बदलीने एकच खळबळ उडाली आहे. ठाण्यात रुजू झाल्यानंतर ठाण्याची विस्कटलेली घडी बसविण्याबरोबरच कार्यक्षेत्रात पोलिसांचा दबदबा निर्माण केला होता; पण काही प्रकरणात त्यांच्या विरुद्ध तक्रारीही झाल्या होत्या. त्याचबरोबर रामतीर्थ येथील दलित मुलीवरील अत्याचार प्रकरणातही त्यांच्यावर बरेच आरोप झाले होते. तक्रारीनंतरही वरिष्ठांनी विश्वास दाखवल्याने ते रामतीर्थ येथेच होते; पण दि. ३ डिसेंबर रोजी मात्र त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि रात्री उशिरा बिलोली उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत राजसाहेब मुत्येपोड यांनी पदभार घेतला.
ध्यानीमनी नसताना अचानक बदली झाल्याने कर्मचारीही आश्चर्यचकित झाले आहेत. एकीकडे तडकाफडकी बदली तर दुसरीकडे तातडीने नवीन अधिकाऱ्यास पदभार दिल्याने वेगळीच चर्चा सुरू झाली असून दि. ३० नोव्हेंबर रोजी रामतीर्थ पोलीस ठाण्यातील वादग्रस्त दोन पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. याच कारणावरून सोमनाथ शिंदे यांची तडकाफडकी बदली झाली असावी, अशी चर्चा होत आहे.
रामतीर्थ पोलीस ठाण्यातील गोविंद पवार, हणमंत श्रीरामे हे दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्यानंतर इंडियन पँथर सेनेचे संविधान दुगाने यांनी लाचप्रकरणी सोमनाथ शिंदे यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली होती.