वेबिनारव्दारे सिईओ वर्षा ठाकूर यांनी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:15 AM2021-01-04T04:15:50+5:302021-01-04T04:15:50+5:30
त्या म्हणाल्या, गावस्तरापासून अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर तसेच विविध महिला अधिकारी व कर्मचारी नौकरी करुन घराची जबाबदारी सक्षमपणे पार ...
त्या म्हणाल्या, गावस्तरापासून अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर तसेच विविध महिला अधिकारी व कर्मचारी नौकरी करुन घराची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हया आपल्या रोल मॉडेल असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे कार्य पुढे नेणे आज काळाची गरज आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वर्षभर जिल्हा परिषदे अंतर्गत चांगले कार्यक्रम राबविण्याचा मानस जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर व उपाध्यक्षा पद्मारेड्डी सतपलवार यांचा आहे. त्यानुसार महिलांसाठी कार्यशाळा, आरोग्य तपासणी, महिला कायदेविषयक मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, वित्तीय बाबींसंदर्भात प्रशिक्षण, नवतंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, व्याख्यान, परिसंवाद, मुलींचे शिक्षण व संरक्षण आदी कार्यक्रम वर्षभरात राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे.
प्रास्ताविक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार उप मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ.सुधिर ठोंबरे यांनी मानले.