अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा विचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:18 AM2021-05-09T04:18:35+5:302021-05-09T04:18:35+5:30
सदरील सीईटी परीक्षा राज्यातील सर्व इच्छुक इयत्ता दहावीचे विद्यार्थी देतील. या परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी पद्धतीनुसार असेल. सर्व विषयांचा मिळून ...
सदरील सीईटी परीक्षा राज्यातील सर्व इच्छुक इयत्ता दहावीचे विद्यार्थी देतील. या परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी पद्धतीनुसार असेल. सर्व विषयांचा मिळून एकत्रित एक पेपर राहील. त्यासाठी २ तासांचा वेळ देण्यात येईल. ही परीक्षा साधारणता जुलै महिन्यात किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, प्रत्येक शाळेच्या ठिकाणी घेण्यात येईल. राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीकडून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत काय करायचे, याबाबत चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांकडे इयत्ता दहावीची परीक्षा दिल्याचे काहीतरी प्रमाणपत्र असावे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यानुसार, शालेय शिक्षण विभागाकडून सर्व विषयावर १०० गुणांची एकच परीक्षा घेण्याचा विचार केला जात आहे. सुमारे दोन तासांची बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित ही परीक्षा राहणार आहे. या परीक्षेत मिळालेले गुण हीच विद्यार्थ्यांची इयत्ता दहावीची गुणपत्रिका असणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.
चौकट- नांदेड जिल्ह्यातील ४३ हजार ६१२ दहावीला आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अभ्यास बंद केला. मात्र, आता पुन्हा सर्व विषयांचा एक पेपर द्यावा लागणार असल्याने, विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. या संदर्भात शासनाकडून कोणताही अधिकृत निर्णय झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.