किसान सभेच्या वतीने किनवट तालुक्यात विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:16 AM2021-02-07T04:16:50+5:302021-02-07T04:16:50+5:30
संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या हाकेनुसार ६ फेब्रुवारी रोजी किनवट येथील कोठारी (चि ) नाक्यावर व खरबी टी पॉइंट ...
संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या हाकेनुसार ६ फेब्रुवारी रोजी किनवट येथील कोठारी (चि ) नाक्यावर व खरबी टी पॉइंट व इस्लापूर फाटा राज्य महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी आंदोलन मोडीत काढण्यासाठी हिंस्र व कुटिल मार्गाचा अवलंब केला आहे. केंद्र सरकार राज्यात होणारे शेतकऱ्यांचे आंदोलनही याच प्रकारे हाताळत आहे. संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने सरकारच्या या कृतीचा धिक्कार करण्यात आला. केंद्र सरकारने काळे कायदे तातडीने रद्द करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काॅ. अर्जुन आडे यांनी यावेळी दिला. इस्लापूर येथे झालेल्या आंदोलनात किसान सभेचे नेते काॅ. अर्जुन आडे ,काॅ. खंडेराव कानडे,काॅ. स्टॅलिन आडे , गटपाळे गुरुजी, अनिल आडे, मोहन जाधव, पवन जेकेवाड, अमोल उमडे, मधुकर राठोड, संतोष राठोड, लक्ष्मण राठोड, इरफान पठाण, शिवाजी किरवले, आनंद लव्हाळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किनवट येथे शैलजा आडे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार ,बोनलेवाड आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.