भाजपानेत्यांपुढे कार्यकर्ते टिकविण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:18 AM2020-12-06T04:18:48+5:302020-12-06T04:18:48+5:30
आगामी काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका होणार आहेत.याबरोबरच हिमायतनगर आणि नायगाव नगरपंचायतीबरोबर भोकर नगरपालिकेचाही निवडणूक आखाडा पेटणार आहे. ...
आगामी काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका होणार आहेत.याबरोबरच हिमायतनगर आणि नायगाव नगरपंचायतीबरोबर भोकर नगरपालिकेचाही निवडणूक आखाडा पेटणार आहे. यातील हिमायतनगर व नायगाव नगरपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत नुकतीच जाहीर झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात ग्रामीण भागात राजकीय रणधुमाळी शिगेला पोहचलेली दिसेल.
चौकट-----------------
भाजपा पदाधिकारी काँग्रेस-सेनेच्या वाटेवर
भोकर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नागनाथ घिसेवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे भोकरमध्ये काँग्रेसला आणखीनच बळकटी प्राप्त झाली आहे. त्यातच पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचे आणखी काही मोहरे काँग्रेस-शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे मागील वर्षभरात भाजप नेत्यांनी राज्यातील सरकार लवकरच कोसळणार असल्याचे सांगत काठावर असलेल्या भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पक्षात थांबवून घेतलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर या कार्यकर्त्यांना पक्षात थांबविण्याचे मोठे आव्हान भाजप नेत्यांपुढे असेल.