सवयी बदला, आयुष्य बदलेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 01:03 AM2018-12-16T01:03:49+5:302018-12-16T01:05:08+5:30

आजच्या बदलत्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात स्थुलता , मधुमेहामुळे ह्दयविकाराचे प्रमाण वाढत आहे़ सरळ, सोपा उपाय म्हणजे विनासायास वजन कमी करणे हा जीवनशैलीचा विकास आहे.

Change habits, life will change | सवयी बदला, आयुष्य बदलेल

सवयी बदला, आयुष्य बदलेल

Next
ठळक मुद्देजगन्नाथ दीक्षित मातोश्री भीमाई व्याख्यानमाला

मुखेड : आजच्या बदलत्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात स्थुलता , मधुमेहामुळे ह्दयविकाराचे प्रमाण वाढत आहे़ सरळ, सोपा उपाय म्हणजे विनासायास वजन कमी करणे हा जीवनशैलीचा विकास आहे. वजन कमी करण्यासाठी स्वत:चे प्रयत्न गरजेचे आहेत. निश्चय हवा व तीन महिन्यांत याचा लाभ होतो़ यासाठी अनावश्यक सवयी बदल्यास आयुष्य बदलेल, असे प्रतिपादन स्थुलता निवारण अभियानाचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी येथे केले़
‘विनासायास वेट लॉस व मधुमेह प्रतिबंध’ या विषयावर मातोश्री भीमाई व्याख्यानमालेत आठवे पुष्प गुंफताना ते बोलत होते़
अध्यक्षस्थानी भाई श्रीराम गरुडकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. कर्मवीर किशनराव राठोड, नगराध्यक्ष बाबूराव देबडवार, तहसीलदार अतुल जटाळे, डॉ.दिलीप पुंडे, मालाताई पुंडे, जय जोशी, डॉ.मनीषा जोशी यांची उपस्थिती होती. डॉ़ दीक्षित म्हणाले, दिवसातून दोन वेळा जेवण करणे आवश्यक आहे. ५५ मिनिटांत जेवण करणे उपयुक्त आहे.
गरज भासल्यास नारळ पाणी, ताक घ्यावे. दररोज ४५ मिनिटे चालावे. या आहार प्रणालीस त्यांनी धर्माची जोड देत तथागत गौतम बुद्ध, वर्धमान महावीर जैन यांचे उदाहरण दिले. सर्व समाज स्थुलतामुक्त करण्यासाठी जेवणात अतिआग्रह व अन्न वाया जाते म्हणून सर्वच खाणे हे अत्यंत घातक आहे़ यावेळी जय जोशी व डॉ. मनीषा जोशी यांचा सत्कार करण्यात आला़
प्रास्ताविकात डॉ.दिलीप पुंडे म्हणाले, मागील सात वर्षांपासून अविरत व्याख्यानमाला सुरु आहे. आठवे पुष्प गुंफताना व्याख्यानमालेचा हा चढता आलेख आहे. मुखेडवासियांची वैचारिक भूक मोठी आहे. श्रोते या व्याख्यानमालेचे खरे वारकरी आहेत. तरुणांचे अकाली मृत्यू, प्रत्येक उंबरठ्यावर मधुमेह, रक्तदाब, ह्दयविकार व कॅन्सर आहे़ याचा जनतेला लाभ व्हावा म्हणून या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. वीरभद्र मठपती यांच्या वंदे मातरम् गीतगायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली़
संचालन शिवाजी आंबुलगेकर यांनी केले. शिवराज साधू यांनी आभार मानले. मानपत्रवाचन प्रा.डॉ.रामकृष्ण बदने यांनी केले. यशस्वीतेसाठी सुप्रभात मित्रमंडळ, वैद्यकीय संस्था, अनिल कोत्तावार, रमेश मेगदे, अरविंद चिटमलवार, बालाजी इंगोले, बालाजी डोणगाये, व्यंकट शिंदे, शंकर चव्हाण, भास्कर इंगोले, किरण कदम, संदीप गोपछडे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Change habits, life will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.