वृद्धाश्रमात पालकांना सोडणाऱ्या मुलांचे मन परिवर्तन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:18 AM2021-03-05T04:18:34+5:302021-03-05T04:18:34+5:30
कार्यक्रमाला आमदार. बालाजी कल्याणकर, महापौर मोहिनी येवणकर यांच्यासह डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, विनायक जोशी, वि. भा. जोशी, मृदुला ...
कार्यक्रमाला आमदार. बालाजी कल्याणकर, महापौर मोहिनी येवणकर यांच्यासह डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, विनायक जोशी, वि. भा. जोशी, मृदुला जैन, पुष्पा चौधरी, नेमीचंद चौधरी, डॉ. मेघश्री देशमुख, चिरंजीवीलाल दागडीया, प्रकाश पाटणी, शोभा राणी चव्हाण आदींची उपस्थिती होती. प्रारंभी अवनी व पावनी जैन यांनी स्वागत गीत गायिले. तर संस्थेचे उपाध्यक्ष अशोक तेरकर यांनी प्रास्ताविक केले.
या वृद्धाश्रमासाठी पालकमंत्री असताना रस्ता उपलब्ध करून दिला. यापुढेही गरज असेल तेव्हा सहकार्याची भूमिका राहील, असे सावंत यांनी सांगितले. तर आमदार कल्याणकर यांनी वृद्धाश्रमासाठी सहकार्य करण्याला आपले प्राधान्य राहील. वृद्धांची सेवा करणे मी कर्तव्य समजतो, असे सांगितले. पी. डी. जोशी यांनी वृद्धाश्रम हे काळाची गरज असल्याचे नमूद करीत साधारण १० टक्के लोक निपुत्रिक आहेत तर १० टक्के लोक मुलांना परदेशात पाठवतात. तर काही जणांना फक्त मुलीच असल्याने मात्या-पित्यांची काळजी घेणे शक्य होत नसल्याने ते पालकांना वृद्धाश्रमात पाठवतात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सुरेखा पाटणी यांनी वृद्धाश्रमाच्या कामकाजाची माहिती दिली. निता दागडीया आणि प्रा. वैद्य यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकाशचंद शेट्टी, धर्मप्रकाश अग्रवाल, अशोक तेरकर, अधीक्षक आर. एस. वाघमारे यांचीही उपस्थिती होती.