स्वारातीम विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:17 AM2021-04-10T04:17:50+5:302021-04-10T04:17:50+5:30
बी.होक आर.एम. आणि बी. एस्सी.हॉस्पिटीलिटी स्टडीज या अभ्यासक्रमाची १० एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता १६ एप्रिल रोजी होणार आहे. ...
बी.होक आर.एम. आणि बी. एस्सी.हॉस्पिटीलिटी स्टडीज या अभ्यासक्रमाची १० एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता १६ एप्रिल रोजी होणार आहे. एम.ए. (द्वितीय वर्ष), एम.एस.डब्ल्यू (द्वितीय वर्ष), एम.कॉम. (सामान्य) द्वितीय वर्ष, एम.कॉम.(बी.आय.) द्वितीय वर्ष, एम.एस्सी.(सी.एम.) आणि बी.एड. या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता २३ एप्रिल रोजी होईल. एम.बीए. (द्वितीय वर्ष), आणि एम.पीएड. व बी.जे., या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता २८ एप्रिल रोजी होणार आहे. एम.बीए. (द्वितीय वर्ष) या अभ्यासक्रमाची २४ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता २९ एप्रिल रोजी होणार आहे. पी.जे.डी-टी.टी.पी., एम.एड. आणि बी.एफ.ए.,या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता २२ एप्रिल रोजी होणार आहे. बी.सी.ए., बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स), बी.एस्सी. (सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग), बी.एस्सी. (नेटवर्क टेक्नॉलॉजी), आणि बी-होक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) या अभ्यासक्रमाची १० एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता १५ एप्रिल रोजी होणार आहे. बी.एस्सी. (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी), बी.एस्सी (बायोइन्फॉर्मेटिक्स), बी.होक-(डब्लूपिटी), बी.होक.(एफपिपीएस), इंजीनियरिंग आणि विधीमधील एल.एल.बी. (तृतीय), बी.एस.एल. (पाचवा) या अभ्यासक्रमाची १० एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता १२ एप्रिल रोजी होणार आहे. बी.एस्सी. (फूड सायन्स), बी.एस्सी. (बायोकेमिस्ट्री), बी.एस्सी.( फूड टेक्नॉलॉजी), बी. फार्म इत्यादी विषयाची १० एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता १९ एप्रिल रोजी होणार आहे. बी.एस्सी. (बायोकेमिस्ट्री), बीएस्सी. (फूड टेक्नॉलॉजी) आणि बी.फार्म या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता २० एप्रिल रोजी होणार आहे. एम.एस्सी. (जनरल), एम.एस्सी.(एस.अे.एन.), एम.एस्सी. (एस.इ), एम.सी.ए., बी.ए. (आय.डी) आणि एम.जे., (ओल्ड अँड न्यू) या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता २६ एप्रिल रोजी होईल. बी.एड. (व्हीबी) या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता ०४ मे रोजी तर एम.एड. (व्हीजे) या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी होणारी परीक्षा ३० एप्रिल रोजी होईल. बि.पीएड, या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी ची परीक्षा २९ एप्रिल रोजी होईल. बी.लिब. ( ओल्ड & न्यू) आणि एम.लिब. (ओल्ड & न्यू) या अभ्यासक्रमाची १७ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता २७ एप्रिल रोजी होणार आहे.