श्री विसर्जनानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:19 AM2021-09-19T04:19:29+5:302021-09-19T04:19:29+5:30
शहरातील जुनामोंढा, देना बँक, महावीर चौक, तरोडेकर मार्केट, वजिराबाद चौक, कलामंदिर, शिवाजीनगर ते आयटीआय चौकापर्यंतच्या मार्गावर जाण्यास आणि ...
शहरातील जुनामोंढा, देना बँक, महावीर चौक, तरोडेकर मार्केट, वजिराबाद चौक, कलामंदिर, शिवाजीनगर ते आयटीआय चौकापर्यंतच्या मार्गावर जाण्यास आणि येण्यास पूर्णत: बंद राहील. राजकॉर्नरकडून आयटीआयकडे येण्यासाठी राज कॉर्नर, वर्कशॉप टी पॉइंट, श्रीनगर ते आयटीआयपर्यंत डावी बाजू वाहतुकीसाठी बंद राहील. राज कॉर्नर ते तरोडा नाका जाण्यासाठी डावी बाजू बंद राहील. जुनामोंढा ते महावीर चौक मार्गावर येण्यासाठी बंदी राहील. यात्रीनिवास ते जुना मोंढा, बर्की चौक पूर्णत: बंद राहील. सिडको-हडको ते लातूर फाटा भागातून नांदेड शहराकडे नावघाट पुलावरून इतवारा भागात व नवीन पुलावरून जुना मोंढा भागात येणारी वाहतूक बंद राहील.
पोलिसांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गही दिले आहेत. त्यामध्ये वजिराबाद चौकाकडून श्रीनगर, वर्कशॉपकडे जाणारी वाहतूक वजिराबाद चौक, तिरंगा चौक ते पोलीस मुख्यालय गेटसमोरून पक्की चाळ, पोलीस कॉर्नर, लालवाडी अंडरब्रीज, शिवाजीनगर, पिवळी गिरणी ते गणेशनगर वाय पॉइंटकडे मार्ग उपलब्ध राहील. राज कॉर्नर ते जुना मोंढा महामार्गावरील वाहतूक राजकॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, भाग्यनगर, आनंदनगर, नागाजुर्ना टी पॉइंट, अण्णा भाऊ साठे चौक, हिंगोली गेट ओव्हर ब्रीजवरून यात्री निवास पोलीस चौक, अबचलनगर ते पुढे येण्या-जाण्यासाठी वापरता येणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले.