एटीएम कार्ड बदलत शेतकऱ्याच्या खात्यावरील ४० हजार चोरले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 08:38 PM2018-04-12T20:38:22+5:302018-04-12T20:38:22+5:30

शहरातील वामननगर येथील एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा पासवर्ड चोरुन बघितल्यानंतर कार्ड अडकत असल्याचा बहाणा करीत चलाखीने एटीएमची अदलाबदल केली़ त्यानंतर शेतकरी कैलास वानखेडे यांच्या आईच्या खात्यातील ४० हजार रुपये लंपास केले

Changing the ATM card stole 40 thousand on the farmer's account | एटीएम कार्ड बदलत शेतकऱ्याच्या खात्यावरील ४० हजार चोरले 

एटीएम कार्ड बदलत शेतकऱ्याच्या खात्यावरील ४० हजार चोरले 

googlenewsNext

नांदेड : शहरातील वामननगर येथील एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा पासवर्ड चोरुन बघितल्यानंतर कार्ड अडकत असल्याचा बहाणा करीत चलाखीने एटीएमची अदलाबदल केली़ त्यानंतर शेतकरी कैलास वानखेडे यांच्या आईच्या खात्यातील ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना ९ एप्रिल रोजी घडली़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ 

नंदनवन कॉलनी येथील कैलास वानखेडे हे आपल्या आईच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी त्यांचे एटीएम घेऊन वामननगर येथील एटीएम केंद्रावर गेले होते़ यावेळी पहिल्यांदा वानखेडे यांनी एटीएम मशीनमध्ये एटीएम टाकले अन् पासवर्डही टाकला़ परंतु व्यवहार झालाच नाही़ त्याचवेळी वानखेडे यांच्या पाठीमागे असलेल्या अज्ञात व्यक्तीने चोरुन वानखेडे यांनी टाकलेला पासवर्ड पाहिला होता़ 

वानखेडे यांनी दुसऱ्या वेळेस एटीएम मशीनमध्ये एटीएम टाकले़ परंतु ते अडकले़ यावेळी त्यांच्या पाठीमागील व्यक्तीने एटीएम अडकत असून तुम्हाला मदत करतो असे सांगून एटीएमची अदलाबदल केली़ त्यानंतरही पैसे न निघाल्याने वानखेडे हे घरी परतले़ थोड्याच वेळात आरोपीने कैलासनगर व साठे चौक अशा दोन ठिकाणांहून वानखेडे यांच्या आईच्या खात्यातून ४० हजार रुपये काढून घेतले़ पैसे खात्यातून कपात झाल्याचा संदेश वानखेडे यांना त्यांच्या मोबाईलवर आल्यानंतर त्यांनी थेट भाग्यनगर पोलीस ठाणे गाठले़ या ठिकाणी वानखेडे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास पोउपनि ढेमकेवाड हे करीत आहेत़ 

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
वामननगर येथील एटीएम केंद्रातून वानखेडे यांचे एटीएम चोरीला गेले होते़ त्यानंतर आरोपीने कैलासनगर व अण्णा भाऊ साठे चौक येथील एटीएममधून रक्कम काढली़ त्यामुळे या तिन्ही ठिकाणच्या   सीसीटीव्ही फुटेजची भाग्यनगर पोलिसांकडून तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले़ 

एटीएम वापरताना ही काळजी घ्या
आॅनलाईन बँकिंगमुळे एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे़ परंतु, निष्काळजीपणामुळे आपली फसवणूक होऊ शकते़ त्यासाठी आपल्या एटीएमचा १६ अंकी क्रमांक, पाठीमागील बाजूचा ३ अंकी क्रमांक आणि पासवर्ड नेहमी गोपनीय ठेवावा़ तो कोणालाही सांगू नये, फोनवर एटीएमबाबत कोणतीच माहिती देऊ नये़ पेट्रोलपंप, शॉपिंग मॉल इ. ठिकाणी कार्ड स्वाईप करताना पासवर्ड स्वत: टाकावा तो दुकानदार अथवा पेट्रोल पंपावरील मुलांना सांगू नये़ आॅनलाईन पेमेंट करताना नेट कॅफे अथवा सार्वजनिक ठिकाणी मोफत मिळणाऱ्या इंटरनेटचा वापर करू नये़  - धनंजय पेनूरकर, शाखा व्यवस्थापक, अ‍ॅक्सिस बँक, भावसार चौक, नांदेड 

Web Title: Changing the ATM card stole 40 thousand on the farmer's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.