ऐतिहासिक मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीस नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करणार- चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:24 AM2021-08-18T04:24:02+5:302021-08-18T04:24:02+5:30

शहरातील व्यंकटेश नगर भागातील मराठवाडा खादी ग्रामोद्योग कार्यालयास १६ ऑगस्ट रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. ...

Chavan will try to give a new impetus to the historic Marathwada Khadi Village Industries Committee - Chavan | ऐतिहासिक मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीस नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करणार- चव्हाण

ऐतिहासिक मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीस नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करणार- चव्हाण

Next

शहरातील व्यंकटेश नगर भागातील मराठवाडा खादी ग्रामोद्योग कार्यालयास १६ ऑगस्ट रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी मराठवाडा खादी ग्रामोद्योगाचे ईश्‍वरराव भोसीकर, हंसराज वैद्य, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर, काँग्रेसचे प्रवक्ता संतोष पांडागळे आदी उपस्थितीत होते.

यावेळी मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे ईश्‍वरराव भोसीकर यांनी राष्ट्रध्वज निर्मिती केंद्रात तयार होणारा तिरंगा ध्वज देशातील १६ राज्यात पाठविण्यात येत असल्याचे सांगितले. या समवेतच मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या अन्य प्रश्‍नांकडेही लक्ष वेधले.

या प्रसंगी पालकमंत्री चव्हाण म्हणाले, यंदाचे वर्ष देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या वर्षाच्या निमित्ताने ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे पुनर्जीवितासाठी राज्य शासनाकडून मदत करण्यात येईल. या संस्थेतील बंद पडलेले उपक्रम सुरू करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने संपूर्ण मदत मिळवून देण्याचा शब्द दिला. या वास्तूचे जुने रूप कायम ठेवून इमारतींना बळकटी देण्यासंदर्भात कायम करता येईल याबाबतचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा, असे निर्देश चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Web Title: Chavan will try to give a new impetus to the historic Marathwada Khadi Village Industries Committee - Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.