अंगणवाडीत शिजवलेल्या मटकीत किडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:20 AM2019-07-13T00:20:37+5:302019-07-13T00:25:16+5:30

मुदखेड तालुक्यातील बारड सर्कलमधील जवळा मुरार ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अंगणवाडी केंद्रात शिजवलेल्या मटकीत भोंगे किडे आढळून आल्याचा प्रकार शुक्रवारी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला़

Chicken insect in anganwadi | अंगणवाडीत शिजवलेल्या मटकीत किडे

अंगणवाडीत शिजवलेल्या मटकीत किडे

Next
ठळक मुद्देमुदखेड तालुक्यातील जवळामुरार येथील प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेने उघडकीस आली घटना ग्रामस्थांसमोर पंचनामा

बारड : मुदखेड तालुक्यातील बारड सर्कलमधील जवळा मुरार ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अंगणवाडी केंद्रात शिजवलेल्या मटकीत भोंगे किडे आढळून आल्याचा प्रकार शुक्रवारी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला़ घटनेची माहिती मिळताच प्रभारी बालविकास अधिकारी मारोती जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला़
अंगणवाडी केंद्रातील मुलांना खाण्यासाठी म्हणून मटकी दिली जाते़ नेहमीप्रमाणे आजही मटकी देण्यात आली होती़ मात्र मटकी पाहताच मुलांना धक्काच बसला़ शिजवलेल्या मटकीत भोंगे किडे आढळून आले़ हा प्रकार लक्षात आल्यावर गावातील महिलांनी अंगणवाडी केंद्र गाठून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जाब विचारला़ तुम्ही आमच्या मुलांना किडे असलेला खाऊ खाऊ घालता का? असा सवाल करत प्रश्नांची सरबत्ती केली़ यावर अंगणवाडी सेविका व मदतनीस दोघेही निरुत्तर झाले़ अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उलटसुलट उत्तरे देवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला़ महिलांनी ही बाब गावकऱ्यांना सांगितली़ गावकºयांनी मुदखेडचे गटविकास अधिकारी चंद्रकांत जगताप यांच्याशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला़ जगताप यांच्या सूचनेनुसार प्रभारी बालविकास अधिकारी मारोती जाधव, ग्रामविकास अधिकारी रेगुलवार यांनी घटनास्थळी भेट दिली़
यावेळी उपस्थित महिलांनी मटकीतील किडे दाखवून रेगुलवार यांच्यावरही प्रश्नांची सरबत्ती केली़ नंतर त्यांनी पंचनामा केला़
अंगणवाडीसेविका, मदतनीसला नोटीस
मुदखेडचे प्रभारी बालविकास अधिकारी मारोती जाधव, ग्रामविकास अधिकारी रेगुलवार यांनी अंगणवाडी गाठून गावक-यांसमोरच पंचनामा केला़
यावेळी त्यांनी किडे असलेला खाऊ का शिजविला? शिजवलेला तो खाऊ बालकांना का दिला? असा जाब अंगणवाडी सेविका व मदतनिसांना विचारला़
एकूणच झालेला प्रकार अक्षम्य निष्काळजीपणाने झाल्याचे सांगून जाधव व रेगुलवार यांनी या घटनेला अंगणवाडी सेविका व मदतनीसला जबाबदार धरून त्यांना नोटीस बजावली़
काही बालकांनी मटकी खाल्ली होती़ मात्र त्यांना काहीही झाले नाही़ कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही़

माझ्याकडे धर्माबादचाही पदभार आहे़ जवळामुरार येथील प्रकाराबाबत माहिती मिळताच पंचनामा करण्यासाठी बालविकास अधिकारी, सुपरवायझर यांना घटनास्थळाकडे रवाना होण्याच्या सूचना मी केल्या होत्या -चंद्रप्रकाश जगताप, बीडीओ, मुदखेड
अंगणवाडी केंद्रांतर्गत शिक्षण घेणा-या लेकरांना निकृृष्ट दर्जाचा खाऊ दिला जातो़ हा प्रकार आरोग्यासाठी हानीकारक आहे -संतोष लखे, आनंदा नागरे, संतोष लोखंडे, रा़ जवळामुरार

Web Title: Chicken insect in anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.