अत्याचाराची वाचा फुटल्याने केला बालविवाह; मुल झाल्यानंतर आता नांदविण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 04:34 PM2021-10-23T16:34:36+5:302021-10-23T16:38:56+5:30

घरी कोणी नसल्याचे कारण देत अल्पवयीन मुलीस कपडे धुण्याच्या कामासाठी बोलावून केला अत्याचार

Child marriage committed due to atrocities; Refuse to bathe now after having a child | अत्याचाराची वाचा फुटल्याने केला बालविवाह; मुल झाल्यानंतर आता नांदविण्यास नकार

अत्याचाराची वाचा फुटल्याने केला बालविवाह; मुल झाल्यानंतर आता नांदविण्यास नकार

Next
ठळक मुद्देलोहा शहरातील सेवादास तांडा येथील घटना

लोहा : अल्पवयीन मुलीस कपडे धुण्याच्या कामासाठी घरी बोलावून अनकेदा अत्याचार केले. हे उघडीस आल्याने त्यांचा बालविवाह लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील सेवादास नगर तांडा येथे उघडकीस आली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार करून नांदविण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून मुलगा आणि त्याच्या आईवडिलांच्याविरोधात शुक्रवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुलगा विजय राठोड, आई अनुसयाबाई राठोड व वडील अंकुश राठोड अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी विजय याने घरात कोणी नसल्याचे कारण सांगून पिडीत अल्पवयीन मुलीस कपडे धुण्याच्या कामासाठी बोलावले. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. तसेच यानंतर जीवे मारण्याची धमकी देत सातत्याने पिडीतेवर अत्याचार केले. हे उघडकीस आल्यानंतर विजयच्या आईवडिलांनी त्यांचा बालविवाह लावून दिला.

दरम्यान, त्यांना एक वर्षाचे मुल आहे. आरोपीने आता पिडीतेस नांदविण्यास नकार दिला आहे. पिडीतेने याची माहिती वडिलांना दिली. शुक्रवारी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विजय राठोड, अंकुश राठोड व अनुसयाबाई राठोड यांच्याविरोधात बाललैंगिक, बालविवाह अंतर्गत लोहा पोलिस ठण्यात गुन्हा नोंदवण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रेखा काळे  पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Child marriage committed due to atrocities; Refuse to bathe now after having a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.