कोरोनाकाळात बालविवाह वाढले; विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:19+5:302021-07-20T04:14:19+5:30

जिल्ह्यात जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आहेत. आता ग्रामीण भागात शासन निर्देशाप्रमाणे आठवी ते बारावीच्या ...

Child marriage increased during the Corona period; Mangalsutra around students' necks! | कोरोनाकाळात बालविवाह वाढले; विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र !

कोरोनाकाळात बालविवाह वाढले; विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र !

Next

जिल्ह्यात जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आहेत. आता ग्रामीण भागात शासन निर्देशाप्रमाणे आठवी ते बारावीच्या शाळा सुरू केल्या आहेत. या शाळा सुरू केल्यानंतर कोरोनापूर्वी शाळामधील विद्यार्थ्यांची संख्या आणि आताची विद्यार्थी संख्या यात तफावत आढळते आहे. प्रामुख्याने विद्यार्थिनींची संख्या कमी झाली आहे. ग्रामीण भागात मुलींचे विवाह लवकर करण्याकडे पालकांचा कल असतो. त्यामुळेही मुलींची संख्या घटल्याचे चित्र आहे.

पटसंख्या कमी झालेली

मुली गेल्या कुठे?

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या सातवीपर्यंत शाळा असतात. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जावे लागते. पालक आपल्या मुलींना गावाबाहेरील शाळेत पाठविण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे त्यांच्या विवाहाचे प्रयत्न सुरू होतात.

दहावीच्या विद्यार्थिनींची शाळेत संख्या घटली

n जिल्ह्यात ग्रामीण भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या वर्गामध्ये नववी, दहावीतील विद्यार्थिनींची संख्या कमी झाली आहे. पालक शाळेत मुलांना पाठवण्यास तयार नसल्यानेही ही संख्या घटल्याचे दिसत आहे.

आर्थिक विवंचना हेच कारण

n कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार हिरावला. ग्रामीण भागातही वेगळे चित्र नव्हते.

n परिणामी पालक आपली जबाबदारी पूर्ण करण्याची घाई करीत होते. ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण आहेच.

जिल्ह्यात कोरोनाकाळात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्वच यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे माहिती मिळताच ३० बालविवाह रोखण्यात आले आहे. - रेखा काळम,

महिला व बालविकास अधिकारी

कोरोनाने अनेकांना रोजगारापासून वंचित रहावे लागले. ग्रामीण भागातील पालकांची मानसिकता लक्षात घेता मुलींचा विवाह करून आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतात. यातूनच बालविवाहाचे प्रमाण कोरोना काळात वाढले होते.

- सूर्यकांत इरवंत, सामाजिक कार्यकर्ता,

Web Title: Child marriage increased during the Corona period; Mangalsutra around students' necks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.