पहिली ते चौथीची मुले घरात कंटाळली, त्यांना हवी शाळा, पालकांची ना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:17 AM2021-02-15T04:17:00+5:302021-02-15T04:17:00+5:30
चौकट- माझा मित्र शाळेत जात आहे. त्यामुळे मलासुद्धा शाळेत जायचे आहे. खूप दिवसांनी शाळेत गेलोच नाही. किती दिवस शाळेत ...
चौकट- माझा मित्र शाळेत जात आहे. त्यामुळे मलासुद्धा शाळेत जायचे आहे. खूप दिवसांनी शाळेत गेलोच नाही. किती दिवस शाळेत जायचे नाही, हे पण कोणी सांगत नाही.
- सिद्धांत वानखेडे, पहिलीचा विद्यार्थी
चौकट- आम्हाला शाळेत शिकवितात तसे मोबाईलवर शिकविलेले काही समजत नाही. मोबाईलवर सांगितलेले काही लक्षात राहात नाही. त्यामुळे शाळेत जायचे आहे.
- सुयश भिसे, दुसरीचा विद्यार्थी
चाैकट- मागील वर्षीचा अभ्यास लक्षात राहिला नाही. आता तिसरीचा अभ्यास मोबाईलवर समजत नाही. शाळेत शिक्षक व्यवस्थित समजून सांगतात. त्यामुळे लक्षात राहाते. त्यामुळे शाळा सुरू कराव्यात.
- प्रथमेश मोहिते, तिसरीचा विद्यार्थी
चाैकट- घरी बसून कंटाळा आला आहे. वर्षभर मोबाईलवर अभ्यास केला. परंतु काही समजत नाही. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा असतात. या परीक्षेला बसण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी शाळेत गेल्याशिवाय पर्याय नाही.
- सार्थक उपाडे, चौथीचा विद्यार्थी
चौकट- पालकांना चिंता.
- शाळा प्रशासनाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी लागत आहे. विद्यार्थ्यांची तपासणी करणे, सॅनिटायझर देणे, सुरक्षित अंतर ठेवणे, अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे लागत आहे. त्यामुळे चाैथीपर्यंत शाळा सध्या तरी सुरू करू नयेत.
- शेषेराव लांडगे, पालक.
- मुलांना अद्याप कोरोनाचे गांभीर्य माहिती नाही. शाळेत गेल्यानंतर ती किती काळजी घेतील, हा प्रश्न आहे. त्यामुळे मुलांना आम्ही शाळेत पाठविणार नाही. - प्रवीण जाधव, पालक
- मागील अनेक महिन्यांपासून घरात बसून कंटाळलेल्या व ऑनलाईन अभ्यास करून थकलेल्या विद्यार्थ्यांना आता शाळेच्या प्रांगणात बागडण्याची, मित्रांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळा सुरू कराव्यात. - राज गायकवाड, पालक