कोरोनानंतर बालकांना ‘एमएसआयसी’चा धोका; आता पालकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:14 AM2021-06-28T04:14:16+5:302021-06-28T04:14:16+5:30

संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना धोका अधिक असल्याचे सांगितले जात होते. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजनाही केल्या जात आहेत. जिल्हास्तरीय ...

Children at risk of MSIC after corona; Now the parents' anxiety increased | कोरोनानंतर बालकांना ‘एमएसआयसी’चा धोका; आता पालकांची चिंता वाढली

कोरोनानंतर बालकांना ‘एमएसआयसी’चा धोका; आता पालकांची चिंता वाढली

Next

संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना धोका अधिक असल्याचे सांगितले जात होते. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजनाही केल्या जात आहेत. जिल्हास्तरीय टास्क फोर्सची स्थापना झाली असून ग्रामीण भागासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी उपाययोजनांकडे लक्ष देत आहेत. त्यातच आता कोरोना झालेल्या बालकांना एमएसआयसी (मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम)चा धोका वाढला आहे. अशी चार बालके जिल्ह्यात आढळली आहेत. उपचारानंतर ती बरी झाली आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरीही कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.

कोट

बालकांमध्ये एमएसआयसी (मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम)ची लक्षणे आढळत असली तरीही त्यात धोका नाही. वेळेवर उपचार घेणे आवश्यक आहे. तापासह इतर लक्षणेही या आजारात आढळतात. प्रतिकार शक्ती कमी झाल्यानेही ही लक्षणे आढळत आहेत.

- डॉ. सलीम तांबे, बालरोग विभाग प्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी

चौकट........

जिल्ह्यात २५० बालकांना कोरोनाची लागण

जिल्ह्यात आतापर्यंत अडीचशे बालकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. उपचारानंतर ही बालके बरी झाली आहेत. तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात विविध उपाययोजनांना प्रारंभ केला जात आहे.

Web Title: Children at risk of MSIC after corona; Now the parents' anxiety increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.