मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:17 AM2021-03-21T04:17:14+5:302021-03-21T04:17:14+5:30

नांदेड - उन्हाळ्याची चाहुल लागली असून, गृहिणी चटणी, मसाला बनवण्यात व्यस्त झाल्या आहेत. या संधीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी मसाल्याचे ...

Chilies, spices hit by inflation | मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका

मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका

Next

नांदेड - उन्हाळ्याची चाहुल लागली असून, गृहिणी चटणी, मसाला बनवण्यात व्यस्त झाल्या आहेत. या संधीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी मसाल्याचे पदार्थ, लाल मिरचीच्या दरात किंचीत वाढ केली आहे. मात्र, एकदा मसाला, चटणी बनवल्यानंतर वर्षभराची चिंता मिटत असल्याने लाल मिरची व मसाल्याचे पदार्थ खरेदीला पसंती दिली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत उन्हाळ्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यावेळी बाजारपेठ बंद असल्याने मिरची व मसाल्याचे पदार्थ फारसे खरेदी करता आले नाहीत. अनेकांनी तयार मसाले व चटणीला पसंती दिली होती. यावर्षीही कोरोना असला, तरी सध्या बाजारपेठ काही वेळ सुरू राहात आहे. त्यामुळे अनेक महिला लाल मिरची व मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्यासाठी सरसावल्या आहेत. गतवर्षापेक्षा लाल मिरची व मसाल्याचे पदार्थांच्या किमतीत किंचीत वाढ झाली आहे. बाजारपेठेत मसाल्याच्या पदार्थांची किंमत वाढली असली, तरीही अनेक गृहिणी मध्यम दर्जाच्या मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करत आहेत.

गृहिणी म्हणतात...

गतवर्षी उन्हाळ्यात कोरोनामुळे मसाला, चटणी करता आली नाही. आता उन्हाळा सुरू झाला असून, मसाला, चटणी बनविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, गतवर्षीपेक्षा लाल मिरची व मसाल्याच्या पदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याने यावर्षी कमी मसाला बनवणार आहे.

- सुचिता काशेटवार, नांदेड

दरवर्षी मसाला, लाल चटणी घरीच तयार करुन स्वयंपाकामध्ये वापरत असते. यावर्षीही चटणी व मसाला बनवणार आहे. मात्र, गतवर्षीपेक्षा मसाल्याच्या काही पदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे मध्यम प्रतीच्या पदार्थांची खरेदी करणार आहे.

- प्रियंका राचलवार, नांदेड

मसाला दर (प्रतिकिलो)

जिरे - १८०, धणे - १४०, तीळ - १५०, खसखस - १,१००, खोबरे - २१०, मेथी - ८०, हळद - १३०, मोहरी - १००,

अन्य मसाले (प्रति १० ग्रॅम)

लवंग १२ रुपये, धोंडफूल ९ रुपये, बदामफूल १३ रुपये, वेलदोडे ५० रुपये, बडीशेप ४ रुपये, जायपत्री २८ रुपये, नागकेशर २४ रुपये, त्रिफळ २७ रुपये.

Web Title: Chilies, spices hit by inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.