लर्निग लायसन्ससाठी निवडा आता आपल्या सोयीची वेळ
By Admin | Published: August 19, 2014 01:31 AM2014-08-19T01:31:22+5:302014-08-19T02:08:33+5:30
शिवाजी राजूरकर , नवीन नांदेड शिकाऊ वाहनचालक परवाना (लर्निग लायसन्स)साठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. लर्निग लायसन्स आॅनलाईन देण्याची
शिवाजी राजूरकर , नवीन नांदेड
शिकाऊ वाहनचालक परवाना (लर्निग लायसन्स)साठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. लर्निग लायसन्स आॅनलाईन देण्याची सुविधा नांदेड येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाने उपलब्ध करुन दिली. त्यामुळे वाहनचालकांना आता आपल्या सोयीच्या वेळेनुसार आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.
लर्निग लायसन्स मिळविण्यासाठी अनेकवेळा वाहनचालकांची आरटीओ कार्यालयात प्रचंड गर्दी होत असते. नागरिकांना तासन्तास रांगेमध्ये थांबावे लागते यामुळे वेळ व श्रेम वाया जातात. हे सर्व टाळण्यासाठी शासनाने आता लर्निग लायसन्स आॅनलाईन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. याबाबतची ‘आॅनलाईन अपॉइंटमेंट’ची सुविधा नांदेडच्या आरटीओ कार्यालयात करुन देण्यात आली आहे.
दैनंदिन कामकाजात जे उमेदवार शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अपॉइटमेंटसह हजर राहतील, त्यांच्यासाठी रांगेत प्राधान्य द्यावे, ज्यामुळे कोणत्याही कार्यटप्प्यात वाहनचालक उमेदवारास रांगेत उभे न राहता प्राधान्याने सेवा दिली जाईल. सद्यस्थितीत दैनंदिन क्षमतेच्या ५० टक्के उमेदवार संख्या आॅनलाईन अपॉंइटमेंटसाठी राखीव ठेवावी. सदर पद्धत जनतेमध्ये रुळल्यानंतर हळहळू आॅनलाईन अपॉइंटमेंटसाठी ९० टक्के पर्यंत उमेदवार संख्या वाढविण्याच्या सूचना खात्याच्या वरिष्ठांनी दिल्या आहेत.