नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिडकोत दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:17 AM2021-04-24T04:17:47+5:302021-04-24T04:17:47+5:30

पथकाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने १५ ते ३१ एप्रिलपर्यंत नियमानुसार दुकाने व ...

CIDCO punitive action for violating rules | नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिडकोत दंडात्मक कारवाई

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिडकोत दंडात्मक कारवाई

Next

पथकाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने १५ ते ३१ एप्रिलपर्यंत नियमानुसार दुकाने व संचारबंदी आदेश लागू आहे. २१ एप्रिलपासून सकाळी ७ ते ११ या कालावधीत ठरावीक नियमानुसार काही दुकानदारांना परवानगी दिली आहे; परंतु नियोजित वेळेनंतरही काही दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनपाचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा प्रतिबंधक उपाययोजना पथक क्र. ६ चे प्रमुख रमेश चवरे, पुरुषोत्तम कमतगीकर, प्रभुयोत टुटेजा, गजानन ठाकूर, गिरीश काठीकर, फिरोज पाशा व सिडको क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्त रावण सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली जय कांबळे, जाधव, चंद्रकांत गायकवाड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक होळकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी सिडको, हडको परिसरातील मुख्य रस्त्यावरील विविध प्रतिष्ठानांची तपासणी केली. यावेळी काही दुकानदार शटर बंद करून आतून व्यवसाय करीत असल्याचे आढळले, तर नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ सार्वजनिक रोडवर फळ विक्री करणाऱ्या १० दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून ६ हजार ९०० रुपये दंड वसूल केला.

Web Title: CIDCO punitive action for violating rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.