गाव पाणीदार करण्यासाठी लोहा तालुक्यातील ६८ गावांतील नागरिक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:58 AM2018-04-30T00:58:26+5:302018-04-30T00:58:26+5:30

गाव पाणीदार करून पाणी फाऊंडेशनचे बक्षीस मिळविण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून सकाळी व सायंकाळच्या वेळी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला, अपंग व अबालवृद्ध सहभागी झाल्याचे चित्र तालुक्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे़

A citizen of 68 villages in the Iron Tillar to make the village watery | गाव पाणीदार करण्यासाठी लोहा तालुक्यातील ६८ गावांतील नागरिक सरसावले

गाव पाणीदार करण्यासाठी लोहा तालुक्यातील ६८ गावांतील नागरिक सरसावले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोहा : ‘सत्यमेव जयते’ प्रस्तुत पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप २०१८ च्या माध्यमातून गाव पाणीदार करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने लोहा तालुक्यातील काही गावांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले़ प्रारंभी चार-पाच नागरिकांच्या श्रमदानातून सुरू झालेली कामे आजघडीला पाहता पाहता शेकडोंच्या सहभागाने कामे सुरू झाली़ गाव पाणीदार करून पाणी फाऊंडेशनचे बक्षीस मिळविण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून सकाळी व सायंकाळच्या वेळी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला, अपंग व अबालवृद्ध सहभागी झाल्याचे चित्र तालुक्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे़
मागील चार महिन्यांपासून पाणी फाऊंडेशनचे सुगंध पळशे, इंद्रजित पाटील यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जावून ग्रामस्थांच्या बैठका घेऊन पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कर स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले़ त्यामध्ये तालुक्यातील ६८ गावांनी सहभाग घेतला़ ती अशी -दापशेड, टेळकी, दगडगाव, कलंबर खु़, पांगरी, वडेपुरी, खडकमांजरी, शेलगाव, पारडी, सुनेगाव, मारतळा, बोरगाव आ़, आष्टुर, कापशी बु़, पिंपळदरी, धनज बु़, सुगावा, उंबरा, कलंबर बु़, गुंडेवाडी, डोणवाडा, चितळी, मंगरूळ, पोलीसवाडी, हिप्परगा, निळा, मडकेवाडी, जोशी सांगवी, भाद्रा, घुगेवाडी, धनज बु़, वाळकी खु़, बोरगाव को़, हिंदोळा, वडगाव, हरबळ, काबेगाव, जवळा दे़, आडगाव, पळशी, रायवाडी, पिंपळगाव ध़, खेडकरवाडी, पोखरी, कांजाळा, सायाळ, पिंपळगाव म़, रिसनगाव, धानोरा शे़, वाका, सोनखेड, पेनूर, लांडगेवाडी, गोळेगाव, भेंडेगाव, माळेगाव, हिराबोरी तांडा, माळाकोळी, लव्हराळ, मुरंंबी, मस्की, धानोरा म़, हरसद, पोखरभोसी, लोंढेसांगवी, किवळा, दगडसांगवी व बामणी आदींचा समावेश आहे़

नागरिक लोकसहभागातून करताहेत श्रमदान
सदरील ६८ गावांतील नागरिक लोकसहभागातून श्रमदान करत आहेत़ यामध्ये पुरुष, महिला, अपंग, वृद्ध व चिमुकलेही सहभागी होवून श्रमदान करत आहेत़ याला जोड म्हणून मग्रारोहयोची मदत घेण्यात येत आहे़ माती आडवा पाणी जिरवा ही भूमिका घेवून शोषखड्डे, शेततळे, नाला बंडींग, एलबीसी, सीसीटी आदी कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत़
८ एप्रिल रोजी तालुक्यातील वडेपुरी येथील माता रत्नेश्वरी देवीचे दर्शन घेवून रात्री १२ वाजता आ़ प्रतापराव पाटील चिखलीकर, जि़प़सदस्या प्रणिता चिखलीकर यांच्या हस्ते पाणी फाऊंडेशनच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला़ त्याचवेळी इतर २२ गावांनी देखील प्रारंभ केला़ माथा ते पायथा पाणी साठवून रहावे हा उद्देश असून जल, जमीन व जंगल संवर्धनासाठी वॉटर कप मोलाचे ठरून आगामी काळात दुष्काळ कायमचा हटणार असल्यामुळे नागरिक जोमाने कामाला लागले आहेत़ याला जोड म्हणून डॉक्टर मंडळी, जैन संघटना मदतीसाठी पुढे आली आहे़

कृषी अधिकारी विश्वंभर मंगनाळे यांनी योजनेतील पुरस्काराच्या रकमेतून श्रमदान करणाऱ्यांना टोपली, फावडे, खोरे दिल्याने त्यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले़ रायवाडीचे अनिल ऊर्फ एकनाथ मोरे स्वत:हून श्रमदान करत असून वॉटर कप स्पर्धा निमित्तमात्र आहे़ तर गाव पाणीदार करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले़

Web Title: A citizen of 68 villages in the Iron Tillar to make the village watery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.