शहरात १२ वाहनांद्वारे घातली जाते गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:20 AM2021-01-16T04:20:56+5:302021-01-16T04:20:56+5:30
चौकट- शहरात मागील काही दिवसात दिवसा आणि रात्री घरफोडी आणि लुटीच्या घटनात वाढ झाली आहे.पायी जाणारे वृद्ध, महिला यांच्या ...
चौकट-
शहरात मागील काही दिवसात दिवसा आणि रात्री घरफोडी आणि लुटीच्या घटनात वाढ झाली आहे.पायी जाणारे वृद्ध, महिला यांच्या जवळील ऐवज दुचाकीवरुन आलेले चोरटे लंपास करीत आहेत. दिवसाढवळ्या धूमस्टाईल चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे.त्याबराेबर दिवसा घरफोड्याही होत आहेत. त्यामुळे पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज आहे.
चौकट- नांदेड ग्रामीण पोलिसांकडून मामा चौक, वसरणी, सिडको भागात गस्त घातली जाते. परंतु त्यानंतरही या भागात दुचाकीस्वारांना लुटण्याच्या घटना घडत आहेत. भाग्यनगर हद्दीत कॅनॉल रोड, मालेगांव रस्त्यावरही लुटीच्या घटना घडल्या आहेत. प्रत्यक्षात या भागात गस्त अधिक वाढविण्याची गरज आहे.
चौकट- गस्तीवरील वाहनांच्या दररोज नोंदी ठेवल्या जातात. यावरील कर्मचारी ते आपल्या शिफ्टमध्ये कोणत्या वेळी गेले याची नोंद असते. या दररोजच्या पेट्रोलिंगचा आढावा ठाणे प्रमुख घेतात. तसेच काही सूचना करतात. गस्तीच्या मार्गावरील इमारतींच्या सुरक्षा रक्षकांच्याही हे कर्मचारी संपर्कात असतात.