लाच घेताना लिपीक चतुर्भुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:05 AM2018-01-07T00:05:29+5:302018-01-07T00:05:35+5:30
चौकशी अहवाल पत्रव्यवहार शाखेत पाठविण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपीक रमेश गायकवाड यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात सापळा रचून पकडण्यात आले़ ही कारवाई शनिवारी करण्यात आली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : चौकशी अहवाल पत्रव्यवहार शाखेत पाठविण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपीक रमेश गायकवाड यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात सापळा रचून पकडण्यात आले़ ही कारवाई शनिवारी करण्यात आली़
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अर्ज केला होता़ त्यानंतर शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात सापळा रचण्यात आला़ तक्रारदाराच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल पत्रव्यवहार शाखेस पाठविण्यासाठी कनिष्ठ लिपीक रमेश रामजी गायकवाड यांनी एक हजार रुपये लाचेची मागणी केली होती़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणी ही बाब स्पष्ट झाली़ शनिवारी विभागीय चौकशी शाखेच्या खोली क्रमांक ३५ समोर मोकळ्या जागेत रमेश गायकवाड यांनी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारली़ त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या कर्मचाºयांनी त्यांना पकडले़ याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक संजय लाटकर, उपअधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि़बी़एल़ पेडगावकर, बाबू गाजुलवार, एकनाथ गंगातीर्थ, सुरेश पांचाळ, अमरजितसिंह चौधरी, नरेंद्र बोडके यांनी ही कारवाई केली़